‘तिरंगा’ चित्रपटातील नाना पाटेकर-राजकुमार यांच्याशी जोडला अनोखा योगायोग, 100 वर्षांनी जुळली तारीख
नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी गोव्यात अखेरचा श्वास घेतला. अशातच तिरंगा चित्रपटातील सहकलाकार राज कुमार यांच्याशी संबंधित एक विलक्षण योगायोग घडल्याचं समोर आलं आहे.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. 8 ऑक्टोबर 2026 रोजी गोवा येथे वयाच्या 75 व्या वर्षी नाना पाटेकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची तारीख त्यांच्या ‘तिरंगा’ चित्रपटातील सहकलाकार आणि दिग्गज अभिनेते राजकुमार यांच्याशी जोडलेली आहे. विशेष म्हणजे, नाना पाटेकर यांच्या निधनाच्या दिवशीच राजकुमार यांची 100 वी जयंती होती.
1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तिरंगा’ या चित्रपटात नाना पाटेकर आणि राजकुमार यांनी एकत्र काम केले होते. मेहुल कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात वर्षा उसगांवकर, हरीश कुमार आणि ममता कुलकर्णी यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
नाना पाटेकर यांचे निधन 8 ऑक्टोबर 2026 रोजी झाले. विशेष म्हणजे, याच दिवशी तब्बल 100 वर्षांपूर्वी म्हणजेच 8 ऑक्टोबर 1926 रोजी राजकुमार यांचा जन्म झाला होता. त्यामुळे ‘तिरंगा’मधील या दोन दिग्गज कलाकारांच्या आयुष्याशी जोडलेला हा योगायोग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
हृदयविकाराच्या झटक्याने निधन
मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी जवळपास 45 मिनिटे त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला. अक्षय कुमार, राम गोपाल वर्मा, प्रकाश राज, रितेश देशमुख, मनिषा कोईराला, सुनील शेट्टी, अनुपम खेर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीने एक प्रतिभावान आणि दमदार अभिनेता गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
नाना पाटेकरांचा शेवटचा चित्रपट
नाना पाटेकर यांना याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘ओ’रोमिओ’ या चित्रपटात शेवटचे मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले. त्यांचा आगामी आणि अंतिम चित्रपट म्हणून मॅडॉक फिल्म्सच्या ‘शक्ती शालिनी’कडे पाहिले जात आहे. या चित्रपटात अनीत पड्डा आणि विशाल जेठवा प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याची शक्यता होती; मात्र तो पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
