AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर रितेश देशमुख नेमका कोणासमोर हात जोडून झुकला, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, पत्नी जेनेलियाही हैराण होत…

अभिनेता रितेश देशमुख हा कायमच चर्चेत असतो. रितेश देशमुखची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच रितेश देशमुख हा दिसतो. रितेश देशमुख याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे.

अखेर रितेश देशमुख नेमका कोणासमोर हात जोडून झुकला, 'तो' व्हिडीओ व्हायरल, पत्नी जेनेलियाही हैराण होत...
Riteish Deshmukh
| Updated on: Jul 06, 2024 | 1:32 PM
Share

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा कायमच चर्चेत असतो. रितेश देशमुखची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे रितेश देशमुख याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. रितेश देशमुख सोशल मीडियावर सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना रितेश देशमुख दिसतो. मोठ्या संपत्तीचा मालक रितेश देशमुख आहे. रितेश देशमुख याचा काही दिवसांपूर्वीच विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्ये जेनेलिया आणि त्यांचे दोन्ही मुले देखील होती.

अंबानी कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळतंय. अनंत अंबानी हा राधिका मर्चंट हिच्यासोबत लग्न करतोय. प्री वेडिंग फंक्शन जोरदार सुरू आहेत. 5 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका यांची संगीत सेरेमनी झाली. या संगीत सेरेमनीला अनेक बॉलिवूड कलाकार पोहोचले होते. फक्त कलाकारच नाहीतर क्रिकेटर देखील पोहोचले होते. आता या फंक्शनमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

अभिनेता रितेश देशमुख हा देखील पत्नी जेनेलिया हिच्यासोबत पोहोचला होता. यावेळी पापाराझी यांना फोटोसाठी पोझ देत असतानाच अचानक रितेश देशमुख हा हात जोडून वाकून नमस्कार करताना दिसला. अचानक पतीला हे करताना पाहून जेनेलिया ही देखील काही वेळासाठी हैराण झाली. रितेश देशमुख याने नेमके असे का केले हे समजण्याच्या अगोदरच तिथे अभिनेत्री माधुरी दीक्षित ही पतीसोबत पोहोचली.

त्यानंतर जेनेलिया हिने लगेचच मागे बघितले असता माधुरी दीक्षित आणि डॉ. नेने दिसले. यावेळी रितेश देखमुख हा माधुरी आणि नेने यांना नमस्कार करताना दिसला. आता याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून रितेश देशमुख याचे काैतुकही केले आहे. माधुरी या संगीत सेरेमनी पतीसोबत पोहोचली.

बॉलिवूडचे जवळपास सर्वच कलाकार हे या संगीत सेरेमनीमध्ये पोहोचले होते. माधुरी दीक्षित ही लग्नानंतर अनेक वर्ष विदेशात राहिली. आता पतीसोबत काही महिन्यांपूर्वीच माधुरी दीक्षित ही भारतात परतली आहे. माधुरी दीक्षितचे दोन्ही मुले विदेशातच आहेत. माधुरी दीक्षितच्या वाढदिवसानिमित्त तिच्या दोन्ही मुलांनी खास व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला होता. आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ते दिसले होते.

Follow Us
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...