अखेर सैफला डिस्चार्ज, पूर्ण बरा होण्यासाठी किती दिवस, महिने लागतील?, हेल्थ अपडेट काय?
Saif Ali Khan Health Update: गुरुवारी रात्री अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर अभिनेत्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अभिनेत्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टर देखील त्याच्यासाठी महत्त्वाच्या कामाला लागले आहेत.

Saif Ali Khan Health Update: अभिनेता सैफ अली खान याच्या प्राणघातक हल्ला झाल्यानंतर अभिनेत्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 16 जानेवारी रोजी अभिनेत्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आता अखेर 6 दिवसांच्या उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आल्यानंतर आता सैफ अली खान हा बाजूला असलेल्या फॉर्च्युन हाइट्समध्ये राहण्यासाठी जाणार आहे. त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या सैफ अली खानच्या घरी सातत्याने पोलीस तपास सुरु आहे. तसेच सरंक्षक जाळ्याही लावल्या जात आहेत.
डॉक्टरांच्या टीमने सैफ अली खानला घरी घेऊन जाण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, सैफला घरी कधी घेवून जायचं हा निर्णय अभिनेत्याचे कुटुंबिय घेणार आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ आता चालू शकतो, बोलू शकतो, पण पूर्ण बरे होण्यासाठी एक महिना लागेल. म्हणजे डॉक्टरांनी सांगितल्यानुसार अभिनेत्याला पूर्णपणे बरं होण्यासाठी 1 महिना लागणार आहे.
View this post on Instagram
पाठीवर झालेल्या प्लास्टिक सर्जरीनंतर सैफला पूर्णपणे बरं होण्यासाठी एक महिना लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. डॉक्टरांनी सैफला पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला असून जड वस्तू उचलणे, व्यायाम करणे आणि शूटिंग करणे टाळन्याचा सल्ला दिला आहे. तर औषधांचे वेळापत्रक लिलावती हॉस्पिटलमध्ये तयार केले जात आहे.
View this post on Instagram
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्याला लवकरच डिस्चार्ज मिळेल. पण अभिनेता काही दिवस चालू फिरू शकणार नाही. सैफच्या जखमा अद्याप बऱ्या झालेल्या नाहीत, त्यामुळे अभिनेत्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त इतर लोकांना भेटण्यास मनाई करण्यात आली आहे, कारण जखमा बऱ्या झाल्या नाहीत तर संसर्गाचा धोका असू शकतो.
हल्ल्यानंतर घेण्यात आले मोठे निर्णय
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याच्या सोसायटीच्या बाल्कनीत सध्या जाळी बसवण्याचे काम सुरू आहे. हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सुरक्षेसाठी बाल्कनीत जाळी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एढंच नाही तर, मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या सोसायटीचे सुरक्षा रक्षक देखील बदलले जाऊ शकतात, ज्या एजन्सीकडे सुरक्षा रक्षकांचा करार होता तो रद्द करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.