VIDEO : ‘झुम्मे की रात’ वर सलमानसोबत व्यंकटेशचा हटके डान्स

मुंबई : नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असलेला बॉलिवूडचा दंबग अभिनेता सलमान खान सध्या एका व्हिडीओमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार व्यंकटेश दग्गुबत्ती व सलमान खान एकत्र ‘झुम्मे की रात’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.   View this post on Instagram   Congratulations […]

VIDEO : 'झुम्मे की रात' वर सलमानसोबत व्यंकटेशचा हटके डान्स
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

मुंबई : नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असलेला बॉलिवूडचा दंबग अभिनेता सलमान खान सध्या एका व्हिडीओमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार व्यंकटेश दग्गुबत्ती व सलमान खान एकत्र ‘झुम्मे की रात’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

Congratulations Venky ! @venkateshdaggubati

A post shared by Bina Kak (@kakbina) on

जयपूरमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार व्यंकटेश दग्गुबत्ती यांची मुलगी आश्रिता आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सुरेंद्र रेड्डी यांचा नातू विनायक रेड्डी विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाहसोहळ्याला सलमान खानसह, अभिनेत्री बीना काक, बाहुबली फेम राणा दग्गुबत्ती, दाक्षिणात्य सिनेकलाकार नागा चैतन्य आणि त्यांची पत्नी समांथा रुथ प्रभु यांसह अनेक सिनेकलाकारांनी हजेरी लावली.

या विवाहसोहळ्यावेळी सलमान खानने स्वत:च्या किक चित्रपटातील ‘झुमे की रात’ या गाण्यावर नाचण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने व्यंकटेश यांनाही सोबत घेत डान्स करण्यास सांगितले. आणि व्यंकटेश यांनीही सलमानला उत्तम साथ दिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

आश्रिता आणि विनायक यांचा साखरपुडा ६ फेब्रुवारी रोजी पार पडला होता. आश्रिता एक प्रोफेशनल बेकर आणि फूड ब्लॉगर आहे. तर विनायक हा हैद्राबाद रेस क्लबचा चेअरमन असून सुरेंद्र रेड्डी यांचा नातू आहे. येत्या २८ मार्च रोजी हैद्राबादमध्ये एका वेडींग रिसेप्शनचे आयोजन केले आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.