AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानवर का आलीये मुंबतील घरे विकण्याची वेळ? वांद्रे येथीलआणखी एक फ्लॅट विकला अन्…

अभिनेता सलमान खान याने गेल्या दोन वर्षात त्याचे 2 घरे विकली आहे. ज्यातून अभिनेत्याला मोठा फायदा झाला. आता देखील सलमान खान याने वांद्रे येथील स्वतःचा आणखी एक फ्लॅट विकला आहे. ज्याची मोठी अपडेट समोर आली आहे.

सलमान खानवर का आलीये मुंबतील घरे विकण्याची वेळ? वांद्रे येथीलआणखी एक फ्लॅट विकला अन्...
अभिनेता सलमान खान
| Updated on: Jul 12, 2026 | 8:25 AM
Share

अभिनेता सलमान खान आता कोणत्या सिनेमामुळे नाही तर, प्रॉपर्टीमुळे चर्चेत आला आहे. सलमान याने वांद्रे येथील पॉश परिसरातील फ्लॅट विकला आहे. सांगायचं झालं तर, सलमान याचं वांद्रे या शहराशी एक घट्ट् नातं आहे. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये अभिनेता गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे. पण सलमान याने हाच अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकल्याची माहिती समोर येत आहे. यातून अभिनेत्याला मोठा फायदा देखील झाला आहे. याबद्दल आता मोठी माहिती समोर येत आहे. तर जाणून घ्या कोणी घेतला आहे सलमान खान याचा फ्लॅट?

कोणी घेतला आहे सलमान खान याचा फ्लॅट?

प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांनुसार, सलमान खानने हा फ्लॅट 2015 मध्ये 2.88 कोटी रुपयांना खरेदी केला होता. म्हणजे, जवळपास 11 वर्ष त्या फ्लॅटमध्ये राहिल्यानंतर अभिनेत्याने फ्लॅट विकला आहे. ज्यातून भाईजानला मोठा फायदा झाला. हा फ्लॅट वांद्रे पश्चिम (Bandra West) येथील ‘शिव-अस्थान हाइट्स’ (Shiv-Asthan Heights) या प्रसिद्ध रेजिडेंशियल बिल्डिंगमध्ये स्थित आहे. कागदपत्रांनुसार, मुनिरा अकबरअली दांडावाला, महदीअली अकबरअली दांडावाला आणि झेहरा महदीअली दांडावाला यांच्या नावावर अभिनेत्याचा फ्लॅट खरेदी करण्यात आला आहे.

फ्लॅटसोबत दोन कार पार्किंगची जागा

या फ्लॅटचा कार्पेट एरिया 758 चौरस फूट असून, त्यासोबत दोन कार पार्किंगच्या जागा देखील सामिल आहेत. या व्यवहाराची नोंदणी 9 जुलै 2026 रोजी झाली. या व्यवहारासाठी खरेदीदारांनी 21 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30 हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस भरली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या घराची चर्चा रंगली आहे.

सलमान खानने गेल्या वर्षीही एक फ्लॅट विकला होता

सलमान खानने ‘शिव-अस्थान हाइट्स’ (Shiv-Asthan Heights) मधील एक फ्लॅट गेल्या वर्षी विकलेला. जुलै 2025 मध्ये त्याने याच इमारतीतील एक मोठा फ्लॅट 5.35 कोटी रुपयांना विकला होता. विशेष म्हणजे, सलमान खानने मुंबईतील अनेक व्यावसायिक आणि निवासी प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे.

सलमान खान लवकरच नवीन घरात होणार शिफ्ट

समोर आलेल्या माहितीनुसार, सलमान खान याच्या नवीन घराचं काम सुरु आहे. आई सलमा खान यांच्या जागेवर खान कुटुंबियांचं नवीन घर तयार होणार आहे. ही जागा खान कुटुंबियांनी 2011 मध्ये खरेदी केलेली. सलमान खानच्या कुटुंबाला वांद्रे येथील चिंबई भागात एक नवीन निवासी टॉवर उभारण्यासाठी ‘महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी’ची (MCZMA) मंजुरी मिळाली आहे. नवीन घरात संपूर्ण खान कुटुंबिय एकत्र राहणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...