AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिस्चार्ज मिळाल्यानंतर शाहरुख खानचा पहिला फोटो समोर, अभिनेत्याची प्रकृती आता…

Shah Rukh Khan : प्रायव्हेट विमानातून शाहरुख खानला आणलं मुंबईत, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शाहरुख खानचा पहिला फोटो समोर... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किंग खानच्या प्रकृतीची चर्चा... चाहत्यांकडून चिंता व्यक्त...

डिस्चार्ज मिळाल्यानंतर शाहरुख खानचा पहिला फोटो समोर, अभिनेत्याची प्रकृती आता...
| Updated on: May 24, 2024 | 8:43 AM
Share

शाहरुखा खानला बुधवारी उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्याने अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता किंग खानची प्रकृती देखील स्थिर आहे. अहमदाबादच्या केडी रुग्णालयात अभिनेत्यावर उपचार सुरु होते. आता अभिनेत्याला डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर शाहरुख मुंबईत परतला आहे. सांगायचं झालंतर, गुरुवारी संध्याकाळी शाहरुख खानची मॅनेजरने अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिली. त्यानंतर अभिनेत्याला डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेता थेट मुंबईतील ‘मन्नत बंगल्यात’ पोहोचला.

शाहरुख खान प्रायव्हेट विमानाने अहमदाबादहून मुंबईत पोहोचला. शाहरुख खानला डिहायड्रेशनचा त्रास होत होता. हॉटेलवर करण्यात आलेल्या प्राथमिक उपचारानंतरही किंग खानच्या प्रकृतीत सुधारणा नसल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेत्याचा पहिला फोटो समोर येत आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफार विरल भयानीने इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शाहरुख खानचा फाटो पोस्ट केला आहे. अभिनेत्याला उन लागू नये म्हणून सुरक्षारक्षकांनी छत्री पकडली आहे. फोटोमध्ये किंग खानसोबत पत्नी गौरी खान देखील दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शहरुख खाानच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळताच गौरी केडी रुग्णालयात पोहोचली. अभिनेत्री जुही चावला देखील किंग खानची विचारपुस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचली.

उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्याने शाहरुख खानला बुधवारी संध्याकाळी 4 वाजता अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. टीम कोलकाता नाईट रायडर्सला सपोर्ट करण्यासाठी शाहरुख अहमदाबादला पोहोचला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मंगळवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा सामना पाहण्यासाठी शाहरुख खान आला होता.  किंग खान अहमदाबादच्या ITC नर्मदा हॉटेलमध्ये थांबला.

अभिनेत्याला डिस्चार्ज मिळाल्याची माहिती समोर येताच चाहत्यांना देखील दिलासा मिळाला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याची चर्चा रंगली आहे. किंग खानच्या सिनेमांबद्दल सांगायचा झालं तर, अभिनेता ‘किंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाच शाबरुख यांच्यासोबत लेक सुबाना खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Follow Us
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं
दिल्लीत घडामोडी वाढल्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट...
दिल्लीत घडामोडी वाढल्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट संपली, बैठकीत...
अखेर मुलाच्या कष्टाचं चीज झालं; दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया
रात्रभर झोप नव्हती... अखेर मुलाच्या कष्टाचं चीज झालं; प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया
आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर...
आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर दमानियांची सुचक प्रतिक्रिया
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लील
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लीला रवाना; मोठ्या...
उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली! - सुप्रिया सुळे
Supriya Sule | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली!
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली...
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, पहा व्हिडीओ
धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा
Dharmendra Pradhan Resign | धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा देताच...
NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा