AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाक्षीच्या लग्नानंतर भाऊ लव सिन्हाने दिले थेट उत्तर, म्हणाला, माझ्यासाठी कायमच…

सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

सोनाक्षीच्या लग्नानंतर भाऊ लव सिन्हाने दिले थेट उत्तर, म्हणाला, माझ्यासाठी कायमच...
sonakshi sinha
| Updated on: Jul 01, 2024 | 1:30 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल याच्यासोबत 23 जून 2024 रोजी लग्न केले. विशेष म्हणजे लग्नानंतर खास पार्टीचे आयोजनही करण्यात आले. या पार्टीला जवळपास सर्वच बॉलिवूड कलाकार पोहचले होते. हेच नाही तर या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. आपल्याच लग्नात धमाकेदार डान्स करताना सोनाक्षी सिन्हा दिसली. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. मात्र, वडील शत्रुघ्न सिन्हा यांचा हात पकडून सही करताना सोनाक्षी सिन्हा ही दिसली होती.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. झहीर इक्बाल याला सलमान खानने बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. हेच नाही तर सलमान खान आणि झहीर इक्बाल याच्या वडिलांची खास मैत्री आहे. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नामध्ये तिचे दोन्ही भाऊ लव आणि कुश भावांचे कर्तव्य पार पाडताना दिसले नसल्याचे सांगितले जातंय.

हेच नाही तर सोनाक्षीच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मात्र, त्यामध्ये कुठेच लव आणि कुश दिसत नाहीत. यावरून सातत्याने लव आणि कुशला प्रश्न विचारले जात आहेत. नुकताच आता लव सिन्हा याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टच्या माध्यमातून यासर्व चर्चांवर बोलताना लव सिन्हा हा दिसला आहे.

लव सिन्हा याने म्हटले की, मी तिथे सहभागी न होण्याचा निर्णय का घेतला? माझ्या विरोधात चुकीची माहिती आणि ऑनलाईन कॅंपेन चालवल्याने हे बदलणार नाही की, माझ्यासाठी माझे कुटुंब सर्वात वरती आणि अगोदर आहे. नेहमीच माझ्यासाठी माझे कुटुंब सर्वात अगोदर असेल. आता लव याने शेअर केलेली ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. त्या व्हिडीओमध्ये अभिनेता साकिब सलीम हा भावाचे कर्तव्य पार पाडताना दिसला. त्यावेळीच अनेकांनी म्हटले की, लव आणि कुश कुठे गायब आहेत. बहिणीच्या आनंदात सहभागी होताना लव आणि कुश दिसले नाहीत. यामुळेच विविध चर्चा रंगताना सातत्याने दिसत आहेत.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...