AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलाचं पार्थिव मांडीवर ठेवून अभिनेता रात्रभर धायमोकलून रडला; शेखर सुमन म्हणाले, या वेदना जीव घेण्या..

बाॅलिवूड अभिनेते शेखर सुमन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे शेखर सुमन हे आज कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत आणि मुंबईमध्ये त्यांचा अत्यंत आलिशान असा बंगला देखील आहे. शेखर सुमन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

मुलाचं पार्थिव मांडीवर ठेवून अभिनेता रात्रभर धायमोकलून रडला; शेखर सुमन म्हणाले, या वेदना जीव घेण्या..
shekhar suman
| Updated on: May 11, 2024 | 4:04 PM
Share

अभिनेते शेखर सुमन हे त्यांच्या हिरामंडी वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये शेअर सुमन यांच्यासोबत त्याचा लेकही महत्वाच्या भूमिकेत आहे. शेखर सुमन यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवलाय. शेखर सुमन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. शेखर सुमन हे कोट्यवधी संपत्तीचे मालक देखील आहेत. शेखर सुमन यांनी त्यांच्या आयुष्यात खूप जास्त वाईट काळ बघितला आहे. नुकताच शेखर सुमन यांनी एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे शेखर सुमन यांनी केले आहेत.

अध्ययनच्या अगोदर शेखर सुमन यांचा एक मुलगा होता. 11-12 वयाचा असतानाच त्याचे निधन झाले. आयुष सुमन असे त्याचे नाव होते. शेखर सुमन म्हणाले की, त्याला हृदयविकार होता आणि त्याला एक दुर्मिळ आजार होता, ज्याच्यावर उपचार करणे जवळपास अशक्यच होते. त्याच्यावर उपचार अमेरिका आणि लंडनमध्ये करण्यात आला.

त्याला वाचवण्याचा एक पर्याय होता तो म्हणजे ट्रान्सप्लांट. परंतू त्यांना ते योग्य नाही वाटले कारण त्यानंतरही त्याचे आयुष्य खूप वाईट होणार होते. शेखर सुमन पुढे म्हणाले की, ज्यावेळी शेवटचा क्षण आला, त्यावेळी माझ्या पत्नीने देवाकडे अशी प्रार्थना केली की, जी जगातील कोणतीच आई करणार नाहीत. आयुषच्या वेदना आणि त्याला होणारा त्रास तिला पाहावला नाही.

आयुषचे सर्व अवयव बंद पडत होते, त्याला प्रचंड असा त्रास होत होता. यामुळे माझ्या पत्नीने देवाकडे त्याला लवकर घेऊन जाण्याचीच प्रार्थना केली. शेखर सुमन म्हणाले, त्याला आम्ही हॉस्पिटमध्ये घेऊन गेलो आणि त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. माझ्यासाठी तो क्षण खूप वाईट होता, कारण माझा मुलगा माझ्यापासून दूर जात असताना मी काहीच करू शकत नव्हतो.

हेच नाही तर माझा मुलगा माझ्या छातीला चिकडून होता आणि मी रात्रभर त्याला माझ्या मांडीवर घेऊन रडत होतो. त्यावेळी माझ्या पत्नीचीही प्रकृती वाईट होती पण तिने स्वतःची काळजी घेतली आणि आम्हा सर्वांना सांभाळले. माझे वडील एक डाॅक्टर असूनही त्यावेळी खूप रडले. कारण ते स्वत:डाॅक्टर असून त्याला वाचू शकले नाही. त्यांनी कितीतरी लोकांना वाचवले होते परंतू आयुषला ते वाचू शकले नाहीत.

Follow Us
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ.
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!.
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत.
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो.
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे...
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे....
भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली..
भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली...
मोठी बातमी! आता सकाळचा चहा पोळणार... दुधाला महागाईची उकळी.....
मोठी बातमी! आता सकाळचा चहा पोळणार... दुधाला महागाईची उकळी......
मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं.......
मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं........
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.