बाॅलिवूड इंडस्ट्रीवर गंभीर आरोप, सनी देओल याच्या डोळ्यात पाणी, मोठी खळबळ
सनी देओल याचा काही दिवसांपूर्वीच गदर 2 हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे सनी देओल याचा हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले. गदर 2 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ हे सुरूवातीपासूनच बघायला मिळाले. आता नुकताच मोठा खुलासा करण्यात आलाय.

मुंबई : सनी देओल याने नुकताच मोठा खुलासा केला. सनी देओल हा फिल्म महोत्सवाच्या उद्घाटनाच्या समारोहाला गोवा येथे पोहचला. यावेळी सनी देओल हा आपल्या बाॅलिवूड प्रवासाबद्दल बोलताना दिसला. इतकेच नाही तर हे बोलताना थेट सनी देओल याच्या डोळ्यांमधून पाणी येताना दिसले. सनी देओल म्हणाला की, मी स्वत: ला अत्यंत लकी समजतो की, मी माझ्या करिअरची सुरूवात ही राहुल रवैल यांच्यासोबत केली. माझे काही चित्रपट चालले तर काही चित्रपट फ्लाॅप गेले. पण मी केलेले चित्रपट आजही लोकांच्या लक्षात आहेत. त्यांनी मला तीन खूप जास्त चांगले चित्रपट दिले.
मी आज फक्त माझ्या चित्रपटांमुळेच इथे उभा आहे. मुळात म्हणजे माझ्या गदर चित्रपटानंतर माझे खरे स्ट्रगल सुरू झाले. कारण त्यानंतर मला चांगल्या स्क्रिप्टच मिळाल्या नाहीत. मला हव्या तशा आॅफर अजिबातच येत नव्हत्या. पुढे सनी देओल म्हणाला की, त्यानंतर मी काही चित्रपट देखील केले. मात्र, त्यामध्ये तब्बल वीस वर्षांच्या अंतर होता, जो अत्यंत मोठा देखील आहे.
मी फक्त पुढे जाण्याचे काम केले. कारण मी इथे एक स्टार होण्यासाठी नाही तर कलाकार होण्यासाठीच आलो. सनी देओल याचे हे सर्व बोलणे ऐकून डायरेक्टर राजकुमार संतोषी यांना मोठा धक्का बसला. इतकेच नाही तर सनी देओल याचे हे बोलणे ऐकून राजकुमार संतोषी हे थेट ढसाढसा रडताना दिसले. राजकुमार संतोषी यांनी म्हटले की, इंडस्ट्रीने सनी देओलच्या अभिनयाला कधी न्याय हाच दिला नाहीये.
View this post on Instagram
राजकुमार संतोषी पुढे म्हणाले, देव नेहमीच न्याय करतो. राजकुमार संतोषी यांचे बोलणे ऐकून सनी देओल याच्या डोळ्यातही पाणी आले. सनी देओल याचा काही दिवसांपूर्वीच गदर 2 हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. गदर 2 चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठे प्रेम दिले. गदर 2 चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळाली.
गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सनी देओल दिसला. गदर 2 चित्रपटानंतर सनी देओल याच्याकडे बऱ्याच बाॅलिवूड चित्रपटांच्या आॅफर असल्याचे देखील सांगितले जातंय. गदर 2 चित्रपट हा यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरलाय. फक्त भारतामध्येच नाही तर विदेशात देखील या चित्रपटाला चाहत्यांच्या जोरदार प्रतिसाद हा मिळताना दिसला आहे.
