पँट घालतात म्हणून महिला कधी…, अमिषा पटेल हिचं मोठं वक्तव्य सर्वत्र चर्चेत

Bollywood Actress Ameesha Patel: पँट घालतात म्हणून महिला कधी..., असं का म्हणाली 'गदर' फेम अभिनेत्री अमीषा पटेल..., सध्या सर्वत्र अमीषा हिच्या वक्तव्याची चर्चा, अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत

पँट घालतात म्हणून महिला कधी..., अमिषा पटेल हिचं मोठं वक्तव्य सर्वत्र चर्चेत
फाईल फोटो
| Updated on: Sep 20, 2025 | 9:45 AM

Bollywood Actress Ameesha Patel: अभिनेत्री अमीषा पटेल आता बॉलिवूडपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एक काळ असा होता जेव्हा अमिषा हिने आपलं सौंदर्य आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. तिचे अनेक सिनेमे हिट देखील ठरले. पण अभिनेत्रीला हवं तसं यश मिळालं नाही. आता अमिषा एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने महिला आणि पुरुषांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘आम्ही पँट घालतो याचा अर्थ असा नाही की, आम्ही पुरुष आहोत..’ सध्या सर्वत्र अमिषाच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

अमीषा पटेल म्हणाली, ‘महिला एका पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करु शकतात. पण काही खास गोष्टी आहेत, ज्या फक्त आणि फक्त पुरुषांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या मर्यादा ओलांडण्याची काहीही गरज नाही… बायलॉजिकली महिला आणि पुरुषांमध्ये फरक आहे. पण महिला पुरुषांच्या बरोबरीने आहेत असा विचार देखील करायला हवा…’

 

 

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘पण सॉफ्टनेस, महिलांचं चार्म… हे सर्व तसंच राहिलं पाहिजे. पुरुषांनी महिलांना डिनरसाठी घेवून जायला हवं… कुठे गेल्यानंतर खुर्ची मागे घ्यायला हवी… महिलांसाठी दरवाजा खोलला पाहिजे… या सर्व गोष्टी तशाच राहिल्या पाहिजे…’

पुढे अमीषाला विचारण्यात आलं, पुरुष हे सर्व करायला विसरले आहेत. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘महिला देखील हे सर्व विसरल्या आहेत. कारण आपल्या अधिकारांसाठी महिला लढत आहेत, त्यामुळे या सर्व लहान लहान गोष्टींचा विसर पडला आहे… अखेर आम्ही मुली आहोत…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

एवढंच नाही तर, अमीषा हिने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. ‘एक वेळ अशी आली होती की, काही कळत नव्हतं. आर्थिक परिस्थित बिकट होती… ती आयुष्यातील सर्वात वाईट वेळ होती. 2000 – 2003 मध्ये वाईट वेळ आली जेव्हा माझी आजी माझ्यासोबत होती…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.

अमीषा पटेल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री आता बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.