Anushka Sharma | अनुष्का शर्मा हिने फरहान अख्तरच्या ‘या’ चित्रपटाची ऑफर नाकारली, थेट दिले हे मोठे कारण
बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. अनुष्का शर्मा हिने बाॅलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. अनुष्का शर्मा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.

मुंबई : फरहान अख्तरचा जी ले जरा हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. पुढील काही दिवसांमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार असल्याचे सांगितले जात असतानाच प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने या चित्रपटाला नकार दिला. प्रियांका चोप्रा हिने जी ले जरा चित्रपटाला नकार दिल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. प्रियांका चोप्रा ही सध्या हाॅलिवूड (Hollywood) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामुळे तिला जी ले जरा चित्रपटाला वेळ देणे शक्य होत नसल्याने तिने या चित्रपटाला नकार दिल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे काही रिपोर्ट आल्या होत्या की, प्रियांका चोप्रा हिच्यानंतर कतरिना कैफ (Katrina Kaif) हिने देखील चित्रपटाला नकार दिला.
प्रियांका चोप्रा हिने जी ले जरा चित्रपटाला नकार दिल्याने फरहान अख्तर याने अनुष्का शर्मा आणि कियारा अडवाणी यांच्याशी संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे. नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार अनुष्का शर्मा हिने जी ले जरा चित्रपटाला नकार दिल्याचे कळत आहे. अगोदर प्रियांका आणि आता अनुष्का यांनी चित्रपटाला नकार दिल्याने हा मोठा धक्काच चित्रपट निर्मात्यांसाठी आहे.
अनुष्का शर्मा हिने चित्रपटाला नकार देण्याचे कारणही पुढे आले आहे. अनुष्का शर्मा हिचे शेड्युल अगोदरच बिझी असल्याने या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तिच्याकडे डेट शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा या चित्रपटात मुख्य भूमिकेत होत्या. मात्र, अचानक प्रियांका चोप्रा हिने चित्रपटाला नकार दिला.
अनुष्का शर्मा ही शेवटी जिरो या चित्रपटामध्ये दिसली होती. 2018 मध्ये अनुष्का शर्मा हिचा जिरो हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि तो चित्रपट फ्लाॅप गेला. अनुष्का शर्मा हिच्यासोबत या चित्रपटात शाहरुख खान हा मुख्य भूमिकेत होता. जिरोनंतर पठाण चित्रपटातून शाहरुख खान याने बाॅलिवूडमध्ये पुनरागमन केले आहे.
अनुष्का शर्मा हिचे चाहते सतत तिच्या पुनरागमनाची वाट पाहताना दिसत आहेत. कारण 2018 नंतर अनुष्का शर्मा एकाही चित्रपटात दिसली नाहीये. अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांच्या मुलीचे नाव वामिका असे ठेवले असून तिची एकही झलक अजून चाहत्यांना दाखवली नाहीये.
