कुणाच्याही वाट्याला असे दिवस येऊ नयेत, लग्न झाल्यानंतर या 5 अभिनेत्रींनी नरक यातना सोसल्या…!

लग्न आणि त्यानंतरचं आयुष्य याविषयी अनेकांनी अनेक स्वप्न रंगवलेली असतात. पण ती खरी होतातच असं नाही. काही जणांच्या आयुष्यात लग्नानंतर वादळ येतं जे आयुष्य झोपवून परत जातं...!

कुणाच्याही वाट्याला असे दिवस येऊ नयेत, लग्न झाल्यानंतर या 5 अभिनेत्रींनी नरक यातना सोसल्या...!

मुंबई : लग्न म्हणजे मनाच्या कोपऱ्यात आठवणींचा गोड कप्पा… हा कप्पा कधीतरी उघडायचा आणि आठवणींच्या गावी जायचं परंतु हे सुंदर गाव अनेकांच्या नशीबी असतंच असं नाही…. काही व्यक्तींच्या आयुष्यात लग्नानंतर खूप मोठी वादळे येतात जी त्यांचं आयुष्य उध्वस्त करुन जातात. साहजिकच त्या व्यक्तींना लग्नाच्या आठवणी विस्मृतीत जाव्याशा वाटतात. अनेकांनी यादरम्यान नरक यातना सोसल्या असतात. बॉलिवूडमध्येही अशाच काही अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नानंतरचा कठीण काळ व्यतित केला आहे. आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्या सेट झाल्या आहेत. परंतु लग्नाची आठवण त्यांना नकोशी वाटते… (Bollywood Actress Bad Marital Experience Malaika Arora And Shweta tiwari)

मलायका अरोरा मलायका अरोरा आणि अरबाज खानचा घटस्फोट झाला. अनेकांनी या घटस्फोटाला मलायकाला जबाबदार धरलं. अनेक वेळा मलायकाला याबद्दलचे टोमणेही ऐकायला मिळाले. पण एका मुलाखतीत बोलताना आपला घटस्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण सांगताना मलायका म्हणाली, अरबाजला जुगाराचा नाद लागला होता तो काही केल्या सुटत नव्हता. मलायकाने खूप प्रयत्न केले पण काही फायदा होत नव्हता. अखेर तिने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात त्यांच्यात दररोज भांडणं होत. मग दररोज भांडणापेक्षा घटस्फोट घेतलेला बरा म्हणून मलायकाने अखेर निर्णय घेतला आणि ती वेगळी झाली. परंतु दरम्यानच्या काळात तिला खूप मानसिक त्रास झाला.

अमृता सिंह अमृता सिंह आणि सैफ अली खान हे इंडस्ट्रीतलं गोड जोडपं. कुणीही पाहिलं तरी नजर लागेल इतकी सुंदर जोडी.. पण त्यांच्या या जोडीला सैफच्या आईचीच नजरच लागली. सैफची आई शर्मिला टोगार यांना हे लग्न मान्य नव्हतं. शर्मिला या अमृताला त्रास द्यायच्या, असं अमृताने बऱ्याच मुलाखतीत सांगितलं. ज्यानंतर सैफ आणि अमृताने वेगळं व्हायचं निर्णय घेतला.

संगीता बिजलानी संगीता बिजलानीला पहिल्यांदा सलमान खानने धोका दिला आणि त्यानंतर मोहम्मह अझरुद्दीन याच्याशी झालेलं लग्न तुटलं. एका पोस्टमधून तिने पुरुषांच्या विखारी मानसिकतेवर भाष्य करताना ‘पुरुषी’पणावर जोरदार प्रहार केले होते. तिला मिळालेल्या वागणुकीची निंदा करत या आठवणी मला आता कधीच आठवायच्या नाहीत, असा निर्धार तिने एक मुलाखतीत बोलताना केला होता.

श्वेता तिवारी खूप छोट्या वयात श्वेता तिवारीचं लग्न राजा चा्ैधरी बरोबर झालं होतं. परंतु श्वेता थोड्याच दिवसांत घरगुती भांडणांची शिकार झाली होती. राजा तिवारी दारु पिऊन त्याला मारायचा. यातून बाहेर पडण्यासाठी तिला खूप वेळ लागला. अखेर या नरक यातना सहन करण्यापेक्षा आपण वेगळे होऊ, असा निर्यण तिने घेतला.

जेनिफर विंगेट जेनिफर विंगेट आणि करण सिंह ग्रोवर यांच्या प्रेमाचा वसंत ज्या प्रकारे बहरला त्याच्या दुप्पट वेगाने त्यांच्यामधलं प्रेमही ओसरलं. दोघांमध्ये या ना त्या कारणांवरुन त्यांच्यात सारखी भांडणं व्हायची. अखेर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

संबंधित बातम्या :

पडद्यावर आदर्श बहु, वास्तवात संसाराचे तीन तेरा, एकदा मोडलं दुसऱ्यांदा बोहल्यावर, टीव्ही हिरोईन्सची कहाणी

Takht | करण जोहरचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट रद्द, वाचा नेमकं काय घडलं!

Pathan | पठाण चित्रपट बॉलिवूडची शान बनणार? शाहरुखने आखला मोठा प्लॅन!

(Bollywood Actress Bad Marital Experience Malaika Arora And Shweta tiwari)

Published On - 6:03 pm, Tue, 2 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI