Ileana D’cruz हिला डॉक्टरांकडून मिळत नाही मदत; लग्नाआधी आई होणाऱ्या अभिनेत्री पुढे अनेक संकटं!
लग्नाआधी इलियाना देणार बॉयफ्रेंडच्या मुलाला जन्म; पण बाळाच्या जन्माआधी अभिनेत्रीला करावा लागतोय अनेक संकटांचा सामना... पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली...

मुंबई | अभिनेत्री इलियाना डिक्रुझ सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. इलियाना हिने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. महत्त्वाचं म्हणजे लग्नाआधी अभिनेत्री आई होत असल्यामुळे अनेकांनी इलियाना हिला ट्रोल केलं. तर काहींनी मात्र अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रेग्नेंसीची घोषणा केल्यानंतर अभिनेत्री सतत सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने बााळाच्या होणाऱ्या वडिलांचा देखील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आता शुक्रवारी इलियाना हिने आस्क मी एनिथींग सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला.. शिवाय अभिनेत्रीने प्रेग्नेंसीबद्दल अनेक गोष्टी देखील सांगितल्या…
प्रेग्नेंसी दरम्यान वाढणाऱ्या वजनाबद्दल अभिनेत्रीला एक प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘सुरुवातीच्या दिवसांत काळजी वाटत होती. पण आता मला याचा काहीही फरक पडत नाही. कधी – कधी अस्वस्थ वाटतं. पण तुमच्याववर प्रेम करणाऱ्या व्यक्ती कायम तुम्हाला सांगत राहतात की, तुमच्यात एक जीव घडत आहे.’
पुढे अभिनेत्री म्हणजे, ‘जेव्हा तुम्ही आई होणार असता, तेव्हा तुमच्या वाढत्या वजनावर लोक टिपणी करत असतात. तुम्ही डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाता, तेव्हा डॉक्टर देखील मदत करु शकत नाही. वाढत्या वजनाबद्दल सतत डोक्यात विचार येत असतात…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त इलियाना आणि तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगत आहे.

‘मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, गेल्या काही महिन्यात माझ्या शरीरात अनेक बदल झाले आहेत आणि झालेले बदल मला आवडत आहेत. एक उत्तम प्रवास मी सध्या करत आहे. पण कधी – कधी अस्वस्थ वाटतं. अशात माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमुळे मला आनंद मिळतो. त्यामुळे वाढत्या वजनाचा मला काही फरक पडत नाही.’ सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेग्नेंसीची घोषणा केली. लहान बाळाच्या ड्रेसचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. पण लग्नाआधी आई होणार असल्याची घोषणा केल्यामुळे इलियानाला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला.
