Manipur Viral Video | मणिपूरच्या घटनेवर संतापल्या जया बच्चन, म्हणाल्या…, थेट दाखवला सरकारला आरसा, मी तो व्हिडीओ
मणिपूरच्या घटनेनंतर देशामध्ये संताप बघायला मिळतोय. व्हिडीओ व्हायरल झाल्याने लोक हादरल्याचे बघायला मिळतंय. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला राग व्यक्त केलाय. आता बाॅलिवूडचे स्टार देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसत आहेत.

मुंबई : मणिपूर हिंसाचारातील एक व्हिडीओ (Video) हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण संताप व्यक्त करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून संपूर्ण देश हादरल्याचे बघायला मिळतंय. अंगावर थरकाप आणणारा हा व्हिडीओ नक्कीच आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिलांसोबत धक्कादायक घटना (Shocking incident) घडल्याचे स्पष्ट दिसत आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, दोन महिलांना नग्न करून फिरवले जात आहे. इतकेच नाही तर हे लोक चक्क महिलेच्या (Women) अंगाला झटत असल्याचे देखील दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे.
सर्वजण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त करताना दिसत आहेत. बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. धक्कादायक म्हणजे मणिपूरमधील व्हायरल होणारा हा व्हिडीओ तब्बल दोन महिने म्हणजेच मे महिन्यामधील आहे. आता लोक या प्रकरणातील आरोपींनी कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. या व्हिडीओमुळे पायाखालची जमीन हादरलीये.
आता मणिपूरमधील या व्हिडीओवर अभिनेत्री जया बच्चन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. एएनआयला बोलताना जया बच्चन यांनी संताप व्यक्त केला आहे. जया बच्चन म्हणाल्या की, मी तो व्हिडीओ पूर्ण बघूच शकले नाही. मला खूप जास्त वाईट वाटले आणि लाज देखील वाटत होती. हा अत्यंत चुकीचा आणि धक्कादायक प्रकार नक्कीच आहे.
#WATCH | Delhi: I felt so bad, I couldn’t see the entire video. I was ashamed. Nobody cares. Women are being treated so badly. Its very frustrating. Everyday something or the other is happening with women. It’s very saddening: Jaya Bachchan, Rajya Sabha MP on Manipur Incident pic.twitter.com/C748G8kGx0
— ANI (@ANI) July 20, 2023
हा सर्व प्रकार मे मध्ये घडला असून आता याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र, याबद्दल कोणीही संवेदना व्यक्त केली नाही. हीच तर महिलांची इज्जत आहे. उत्तर प्रदेशमधील येथील अर्ध्या गोष्टी या दाखवल्याच जात नाहीत. संपूर्ण देशात महिलांचा हा अपमान का होतो? खरोखरच हे खूप जास्त दु:खाची गोष्ट नक्कीच आहे.
अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री, अक्षय कुमार, सोनू सूद या सारख्या स्टारने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर आरोपीला कठोर शिक्षा देण्याची देखील मागणी सातत्याने केली जात आहे. अनेकांनी या प्रकारानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारला खडेबोल सुनावल्याचे दिसत आहेत. या घटनेच्या व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे.
