
एक काळ बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला आहे. बॉलिवूडमध्ये करीयर यशाच्या शिखरावर असताना ममता अचानक गायब झाली. त्यानंतर अभिनेत्रीच्या नावाची चर्चा अंडरवर्ल्ड डॉनसोबत देखील होऊ लागली. पण आता संन्यास घेतल्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. संन्यास घेतल्यानंतर नुकताच झालेल्या मुलाखतीत ममताने मुस्लिम धर्म स्वीकारला तर त्यात वाईट काय? असं वक्तव्य केलं आहे.
मुलाखतीत ममताला ‘धर्म बदलून विकी गोस्वामी सोबत लग्न करावं लागलं का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ममता म्हणाली, ‘यामध्ये काहीही तथ्य नाही… मी हवन – यज्ञ करणारी महिली आहे. मी आत्मपरीक्षण केलं आहे. माझ्यासाठी सर्व धर्म समान आहे…’
‘मी इस्लाम धर्माचा स्वीकार केला तरी त्यामध्ये काही गैर नाही… यात काही वाईट आहे…. असं मला वाटत नाही. लोकांनी इस्लामचा चुकीचा अर्थ काढला आहे आणि ती त्यांची चूक आहे. मी कुराण पठण केलं आहे. बायबल वाचलं आहे. देव सर्वांना एकच शिकवण देतो…’ असं देखील ममता कुलकर्णी म्हणाली.
सांगायचं झालं तर, एक काळ असा होता, जेव्हा ममताचं नाव ड्रग्स माफिया विक्की गोस्वामी याच्यासोबत जोडण्यात आलं होत. ममताने विकीसोबत लग्न केलं अशा चर्चांनी देखील जोर धरला होता. यावर ममता म्हणाली, ‘मी विकीसोबत लग्न केलं नाही…’ सध्या सर्वत्र ममता कुलकर्णी हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
ममता कुलकर्णीच्या बॉलिवूड प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर, तिने अभिनेता शाहरुख खान, सलमान खान यांसारख्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना अभिनेत्रीने ‘अशांत’, ‘आशिक आवारा’, ‘करण अर्जुन’ आणि ‘वक़्त हमारा है’ या सिनेमांमध्ये काम केलं. अभिनेत्रीवे 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तिरंगा’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आजही अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.