AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nora Fatehi चा कोणासोबत रंगलाय रोमान्स? अभिनेत्रीचा जुना व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते थक्क

Nora Fatehi | बॉलिवूडची डान्सींग क्वीन नोरा फतेही हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. नोरा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री एका जुन्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. ज्यामध्ये अभिनेत्री एका पुरुषासोबत रोमान्स करताना दिसत आहे.

Nora Fatehi चा कोणासोबत रंगलाय रोमान्स? अभिनेत्रीचा जुना व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते थक्क
| Updated on: Mar 01, 2024 | 1:26 PM
Share

मुंबई | 1 मार्च 2024 : अभिनेत्री नोरा फतेही हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण अभिनेत्रीने कधीच स्वतःच्या नात्याची घोषणा केली नाही. सध्या सोशल मीडियावर नोराचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नोरा एका पुरुषासोबत दिसत आहे. नोरा हिच्यासोबत दिसत असलेल्या पुरुष दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता प्रिंस नरुला आहे. प्रिंस याने ‘एमटीवी रोडीज’ पासून ते ‘बिग बॉस’पर्यंत अनेक रिऍलिटी शोंची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली आहे. पण प्रिंस आणि नोरा जुन्या व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत.

सांगायचं झालं तर, प्रिंस नरुला याने अभिनेत्री युविका चौधरी हिच्यासोबत केलं. पण जेव्हा ‘बिग बॉस’मध्ये प्रिंस आणि नोरा दोघे सोबत होते. तेव्हा सर्वत्र नोरा आणि प्रिंस यांच्या नात्याची चर्चा होती. आता ‘बिग बॉस’मधील दोघांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

प्रिंस आणि नोरा यांचा जुना व्हिडीओ पाहून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. शिवाय अनेकांनी दोघांना ट्रोल देखील केलं आहे. प्रिन्स नरुला ‘बिग बॉस 9’ मधील सर्वात लोकप्रिय स्पर्धक होता. घरात राहताना प्रिंसचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं.

नोरा फतेहीसोबत प्रिंसचं अफेअरही होते. मात्र,’बिग बॉस’ संपल्यानंतर दोघांच्या नात्याचा अंत झाला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नोरा प्रिंसच्या मांडीवर बसलेली दिसत आहे, प्रिंस तिच्याशी बोलत असताना आणि तिला किस करताना दिसत आहे.

व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाहीतर, नेटकरी व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत आहे. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘नोरा पूर्वी किती वेगळी दिसत होती…’ दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘प्लास्टिक सर्जरीच्या पूर्वीची नोरा…’

प्रिंस ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर लगेचच नोरासोबतचे नाते कायम राहणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. पण प्रिंस आणि नोरा यांचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर प्रिंसने युविकासोबतच्या रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा केली. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2018 मध्ये त्यांनी लग्न केले. दोघेही आता सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल