AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आलिया, दीपिका नाही तर, ‘ही’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री

India Highest Paid Actress | कोण आहे बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री? तिने आलिया भट्ट आणि दीपिका पादुकोन यांना देखील टाकलं मागे...

आलिया, दीपिका नाही तर, 'ही' आहे भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री
| Updated on: Jan 31, 2025 | 2:58 PM
Share

बॉलिवूडमध्ये अनेक एकापेक्षा एक अभिनेत्री आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट, दीपिका पादुकोन, कियारा अडवाणी, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ, जान्हवी कपूर, सारा अली खान अभियांसारख्या अभिनेत्री सध्या मोठ्या पडद्यावर राज्य करत आहेत. अभिनेत्री त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. अशात तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की दीपिका, आलिया नाही तर, बॉलिवूडची सर्वात महागडी अभनेत्री कोण आहे. ?

बॉलिवूडच्या सर्वात महागड्या अभिनेत्रीबद्दल सांगायचं झालं तर, ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा आहे. प्रियांका सध्या राजामौली आणि महेश बाबू यांच्या SSMB29 सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यक्त आहे. रिपोर्टनुसार, प्रियांका हिने SSMB29 सिनेमासाठी 30 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

प्रियांका हिच्यासाठी 30 कोटी रुपये देखील कमी आहे. कारण अभिनेत्री हॉलिवूडमध्ये अधिक कमाई करते. प्रियांका हॉलिवूडमध्ये अधिक कमाई करत असली तरी अभिनेत्री भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री आहे.

यापूर्वी श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री दीपिका पादुकोन होती. एका सिनेमासाठी अभिनेत्री 15 – 30 कोटी रुपये घ्यायची. सध्या दीपिकाने अभिनेयातून ब्रेक घेतला आहे. गेल्या वर्षी लेकीला जन्म दिल्यानंतर अभिनेत्री आता मातृत्वाचा अनुभव घेत आहे.

तिसऱ्या क्रमांकावर अभिनेत्री कंगना राणौत आहे. कंगना राणौत एका सिनेमासाठी 15 ते 27 कोटी मानधन घेतात. आता कंगना फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, राजकारणात देखील सक्रिय आहेत. कंगना आता हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघाच्या खासदार आहेत. कंगना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

अभिनेत्री कतरिना कैफ ही देखील श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत आहे. कतरिना एका सिनेमासाठी 15 ते 27 कोटी रुपये मानधन घेते. भारतातील श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत कतरिना चौथ्या क्रमांकावर आहे.

यादीमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट हिचं देखील नाव आहे. आलिया हिचं एका सिनेमासाठी मानधन 20 ते 25 कोटी आहे. येत्या काळात आलियाच्या मानधनात देखील वाढ होऊ शकते. आलिया हिने गेल्या काही वर्षांमध्ये दमदार सिनेमे बॉलिवूडला दिले आहे. आलियाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्रीच्या आगामी सिनेमासाठी चाहते कायम उत्सुक असतात.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...