शाहरुख खानच्या चित्रपटाला रवीना टंडनने या मोठ्या कारणामुळे दिला नकार, थेट म्हणाली, मला अस्वस्थ..
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे अभिनेत्रीच्या चित्रपटांनी धमाका केला. आता पहिल्यांदाच अभिनेत्रीने अत्यंत मोठा खुलासा तिच्या चित्रपटांबद्दल केला आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मागील काही दशकांपासून बॉलिवूडमध्ये धमाका करताना दिसतोय. शाहरुख खान आणि जुही चावला यांच्या जोडीने मोठा काळ गाजवला आहे. शाहरुख खान आणि जुही चावला यांनी जवळपास 8 चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांचे जवळपास सर्वच चित्रपट धमाका करताना दिसले. मात्र, यापैकी एक असा चित्रपट होता, ज्यामध्ये निर्मात्यांनी पहिली पसंत जुही चावला नाही तर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन होती. मात्र, काही सीनमुळे रवीना टंडनने या चित्रपटाला स्पष्ट नकार दिला आणि त्यानंतर जुही चावलाला त्या चित्रपटाची ऑफर मिळाली. हा चित्रपट दुसरा तिसरा कोणता नसून शाहरुख खानचा डर चित्रपट होता.
रवीना टंडनने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये डर चित्रपटाबद्दल खुलासा केला. या चित्रपटात शाहरुख खान, सनी देओल आणि जुही चावला मुख्य भूमिकेत होते. रवीना टंडनने म्हटले की, सर्वात अगोदर मला डर चित्रपटाची ऑफर आली होती. तो चित्रपट अश्लील नव्हता. पण काही दृश्ये अशी होती जी मला व्यवस्थित वाटली नाहीत. मी कधीही स्विमिंग कॉस्ट्यूम घालत नव्हते. मी स्विमिंग कॉस्ट्यूम घालणार नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
हो, काही दृश्ये होती, ज्यामुळे मला थोडे अस्वस्थता वाटत होते. यादरम्यान रवीनाने स्पष्ट केले की, असे अजून बरेच चित्रपट होते, ज्याची ऑफर तिला होती. मात्र, तिला काही सीन्स करायची नसल्याने तिने स्पष्टपणे त्या चित्रपटांना नकार दिला आणि दुसऱ्या अभिनेत्रींनी ते चित्रपट केली आणि हीटही झाली. ज्यामध्ये करिश्मा कपूर हिचा देखील एक चित्रपट होता. जैसे प्रेम कैदी चित्रपटाची मला ऑफर होती. पण मी त्याला नकार दिला.
कारण त्या चित्रपटात एक सीन असा होता की, अभिनेता अभिनेत्रील खाली ओढतो. जो सीन मला व्यवस्थित वाटला नाही आणि मी चित्रपटाला नकार दिला. त्यानंतर त्याच चित्रपटातून करिश्मा कपूरला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यात आले. रवीना टंडन पहिल्यादाच आपल्या बॉलिवूड करिअरबद्दल बोलताना दिसली. यादरम्यान तिने काही मोठे खुलासे केले आहेत.
