
Bollywood Actress Rekha Birthday: बॉलिवूड दिसताना प्रचंड आकर्षक दिसतं. पण इंडस्ट्रीतील कलाकारांच्या खासगी आयुष्यातील काही घटना समोर आल्यानंतर धक्का बसतो. प्रोफेशनल आयुष्यात सेलिब्रिटी यशाच्या शिखरावर असले तरी खासगी आयुष्यात मात्र त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. एका अभिनेत्रीच्या वडिलांनी तर तिला कधी स्वीकारलं नाही आणि मुलीचा दर्जा देखील दिला नाही. कारण आईच्या लग्नाआधी अभिनेत्रीचा जन्म झालेला. अभिनेत्रीच्या आईला देखील कधी पत्नीचा दर्जा मिळाला नाही. अभिनेत्री आयुष्यात अनेक चढ – उतार पाहिले. एका मुलाखतीत तर अभिनेत्री स्वतःला ‘मी अपवित्र आहे…’ असं देखील म्हणालेली.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री रेखा आहे. 10 ऑक्टोबर रोजी अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. रेखा आज आलिशान आयुष्य जगत आहेत. पण लहानपणी त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. ज्यामुळे लहान असताना त्यांना काम करावं लागलं… रेखाची आईही कर्जबाजारी होती आणि तिला कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत होता. रेखा यांचे वडील तमिळ सुपरस्टार होते आणि त्यांची आई अभिनेत्री होती, तरीही त्यांना बालपणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.
रेखा यांना संकटांचा सामना केला. त्यांच्या प्रोफेशनल आयुष्या कितीही संकटं आली तरी त्यांनी कधीत माघार घेतली नाही. एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून आज त्यांची ओळख आहे. तर खासगी आयुष्यात देखील रेखा यांनी चढ-उतार पाहिले आहे.
रेखा यांच्या खासगी आयुष्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. अनेक सेलिब्रिटींसोबत रेखा यांच्या नावाची चर्चा झाली. एका मुलाखतीत रेखा यांनी स्वतःला ‘अवित्र’ म्हटलं होतं. शिवाय बॉलिवूडमधील अनेकांनी त्यांच्यावर निशाणा देखील साधला होता. एवढंच नाही तर, रेखा यांच्या पतीने देखील लग्नाच्या सहा महिन्यांनंतर स्वतःला संपवलं..
रेखा आज एकटी असली तरी तिला तिचा एकांत खूप आवडतो आणि ती स्वतःसोबत वेळ घालवते. रेखा अनेकदा शहरात आणि विविध कार्यक्रमांमध्ये दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच तेज असतं, जे ती किती धाडसी आणि बलवान आहे हे दर्शवतं.