Video | श्रद्धा कपूरच्या घरात अचानक शिरला गोरिला! पाहा अभिनेत्रीने पुढे काय केलं…

अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती सतत तिच्या चाहत्यांसोबत संपर्कात असते. परंतु, तिने नुकताच शेअर केलेला व्हिडिओ पाहून तिचे चाहते स्तब्ध झाले आहेत. कारण, या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर एक अतिशय भयानक आणि आक्राळ-विक्राळ गोरिला देखील दिसतो आहे.

Video | श्रद्धा कपूरच्या घरात अचानक शिरला गोरिला! पाहा अभिनेत्रीने पुढे काय केलं...
श्रद्धा कपूर

मुंबई : बॉलिवूडची चुलबुली आणि सुंदर अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आजकाल चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त झाली आहे. अलीकडेच तिच्या आगामी ‘चालबाज इन लंडन’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. पण, सध्या या चित्रपटामुळे नाही तर, श्रद्धा कपूर आता तिच्या एका इन्स्टाग्राम व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. श्रद्धाच्या घरात अचानक एक गोरिला (Gorilla) शिरला होता. मात्र, या गोरिलाला पळवून लावण्याऐवजी या व्हिडीओमध्ये ती त्याच्याबरोबर मजेदार डान्स (Funny Dance) करताना दिसत आहे (Bollywood actress Shraddha Kapoor Funny dance with gorilla).

भीती? छे.. धमाल डान्स..

अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती सतत तिच्या चाहत्यांसोबत संपर्कात असते. परंतु, तिने नुकताच शेअर केलेला व्हिडिओ पाहून तिचे चाहते स्तब्ध झाले आहेत. कारण, या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर एक अतिशय भयानक आणि आक्राळ-विक्राळ गोरिला देखील दिसतो आहे. मात्र, त्याची भीती वाटण्याऐवजी किंवा घाबरण्याऐवजी श्रद्धा कपूर त्याच्याबरोबर धमाल मस्ती करत, छान ठुमके लगावत आहे.

पाहा ‘हा’ धमाल व्हिडीओ…

‘हॅलो चार्ली’ चित्रपटाची जाहिरात

लवकरच अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर ‘हॅलो चार्ली’ (Hello Charlie) हा साहसी कथेवर आधारित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. श्रद्धा आणि गोरिलाचा हा व्हिडीओ देखील या चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग असल्याचे दिसते आहे. कारण, या चित्रपटात टोटो गोरिला आणि सरळ साधा चार्ली (आदर जैन) यांची गंमत पाहायला मिळणार आहे.

चित्रपटांमध्ये व्यस्त श्रद्धा कपूर

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, श्रद्धा कपूर लवकरच ‘चालबाज इन लंडन’मध्ये दुहेरी भूमिका करताना दिसणार आहे. श्रद्धा ही पहिल्यांदाच दुहेरी भूमिका साकारणार आहे. अभिनेत्रीच्या नवीन प्रोजेक्टच्या घोषणेनंतर तिचे चाहते बरेच उत्सुक झाले आहेत. याशिवाय ती निखिल द्विवेदीच्या ‘नागीन’ चित्रपटात एका इच्छाधारी नागीणच्या भूमिकेतही दिसणार आहे (Bollywood actress Shraddha Kapoor Funny dance with gorilla).

रोहन-श्रद्धाची जोडी चर्चेत

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री श्रद्धा कपूर आजकाल आपल्या वैयक्तिक आयुष्यातही खूपच व्यस्त आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार श्रद्धा कपूर सध्या रोहन श्रेष्ठला डेट करत आहे. पण अद्याप या जोडीने एकमेकांबद्दल किंवा या नात्याबद्दल कधीही उघडपणे चर्चा केलेली नाही. पण बर्‍याचदा या कपलने मुंबईत एकत्र वेळ घालवला आहे. त्याचवेळी काही दिवसांपूर्वी या जोडप्याच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावरही खूप चर्चिली जात होती.

शक्ती कपूर म्हणतात…

शक्ती कपूरला जेव्हा श्रद्धाच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारले गेले तेव्हा ते म्हणाले होते की, ‘श्रद्धाच्या लग्नाविषयी ज्या काही गोष्टी ऐकायला मिळत आहेत, त्या फक्त अफवाच आहेत. पुढच्या 4-5 वर्षांनंतर श्रद्धा लग्नाचा विचार करू शकते. सध्या तिच्याकडे बरेच मोठे चित्रपट आहेत आणि तिला तिचे लक्ष या चित्रपटांवर केंद्रित करायचे आहे’. शक्ती कपूर यांनी श्रद्धाच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलताना म्हटले होते की, ‘रोहन एक चांगला मुलगा आहे. तो लहानपणापासूनच आमच्या घरी येत होता. श्रद्धाने मला त्यांच्या लग्नाविषयी काहीही सांगितले नाही. आणि ते दोघंही खूप चांगले मित्र आहेत.’

(Bollywood actress Shraddha Kapoor Funny dance with gorilla)

हेही वाचा :

Video | भाऊ कदम स्क्रिप्ट कशी पाठ करतात माहितेय? पाहा कुशल बद्रिकेने शेअर केलेला खास व्हिडीओ!

PHOTO | धर्मेंद्र ते माधुरी दीक्षित, ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी सहकाऱ्यांच्या मृत्यूनंतर घेतली त्यांची जागा!

Published On - 10:57 am, Wed, 7 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI