PHOTO | धर्मेंद्र ते माधुरी दीक्षित, ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी सहकाऱ्यांच्या मृत्यूनंतर घेतली त्यांची जागा!

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या सहकलाकारांच्या निधनानंतर त्यांना रिप्लेस केलं. अर्थात त्या भूमिका त्यांनी अतिशय सुंदररीत्या निभावल्या.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:26 PM, 6 Apr 2021
1/5
जेव्हा अभिनेत्री दिव्या भारती हिचे निधन झाले तेव्हा तिच्याकडे अनेक चित्रपट होते जे अपूर्ण राहिले. तिने ‘लाडला’ या चित्रपटाचे 80 टक्के शूट केले होते. पण दिव्याच्या निधनानंतर श्रीदेवीने हा चित्रपट पूर्ण केला.
2/5
करण जौहरच्या ‘कलंक’ या चित्रपटात ‘बहार बेगम’च्या भूमिकेसाठी प्रथम श्रीदेवीची निवड करण्यात आली होती. परंतु, अभिनेत्रीच्या निधनानंतर माधुरीने तिची भूमिका साकारली.
3/5
नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या ‘मंटो’ या चित्रपटात ऋषी कपूर यांनी जी ‘चित्रपट निर्मात्या’ची भूमिका केली आहे, ती पहिला ओम पुरी साकारणार होते. तथापि, ओम पुरी यांच्या निधनानंतर हा चित्रपट ऋषी कपूर यांच्याकडे सोपवण्यात आला.
4/5
गुरु दत्त ‘बहारें फिर आएंगे’ चित्रपटाचे चित्रीकरण करत होते आणि त्यावेळीच त्यांचे निधन झाले. मग, धर्मेंद्र यांना त्याच्या जागी चित्रपटात घेण्यात आले.
5/5
दीपिका पदुकोण अभिनित ‘द इंटर्न’ या चित्रपटामध्ये ऋषी कपूर झळकणार होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर ही भूमिका आता अमिताभ बच्चन यांच्या वाट्याला आली आहे.