AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026 IND vs NZ Final: नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव थेट म्हणाला…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा न्यूझीलंडच्या बाजूने लागला. त्यानंतर याबाबत कर्णधार सूर्यकुमार यादवला विचारलं, तेव्हा त्याने सांगितलं की...

T20 WC 2026 IND vs NZ Final: नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव थेट म्हणाला...
T20 WC 2026 IND vs NZ Final: नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव थेट म्हणाला...Image Credit source: Getty Images
| Updated on: Mar 09, 2026 | 1:05 AM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरूवात झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने उभे ठाकले आहे. अवघ्या काही तासात जेतेपदाचा मानकरी ठरणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल झाला आणि भारतीय क्रीडाप्रेमींच्या पदरी निराशा पडली. कारण नाणेफेकीचा कौल काही भारताच्या बाजूने लागला. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची निराशा होणं सहाजिकच आहे. नाणेफेकी जिंकल्यानंतर मिचेल सँटनर याने क्षणाचाही विलंब न करत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. यामुळे भारतीय गोलंदाजांवर धावा रोखण्याचं आव्हान असणार आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर मिचेल सँटनर म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करू. खेळपट्टी चांगली दिसत आहे आणि धावांचा पाठलाग करणं सोपं जाईल. भारतीय संघाला कमी धावांवर रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. संघ चांगला खेळत आहे आणि उपांत्य फेरीतील कामगिरीनंतर आत्मविश्वास दुणावला आहे. या सामन्यासाठी तयार आहोत.

कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीचा कौल गमवला असला तर निर्णय मात्र मनासारखा लागला आहे. कारण नाणेफेक जिंकली असती तरी प्रथम फलंदाजीच घेतली असती असं सूर्यकुमार यादव म्हणाला. सूर्यकुमार यादवने स्पष्ट केलं की, ‘आम्ही चांगली कामगिरी करत असल्याने प्रथम फलंदाजी करण्यास मिळाल्याने आनंद आहे. उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत धावा असणे नेहमीच चांगले असते. आता हा इतिहास आहे, नवीन विश्वचषक आहे आणि आम्ही त्यासाठी उत्सुक आहोत.आशा आहे की आम्ही त्यांना चांगला खेळ दाखवू. त्याच संघासह मैदानात उतरू.’ या सामन्यापूर्वी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये दोन बदल केले जातील अशी चर्चा होती. पण त्यात काहीच बदल झालेला नाही. अभिषेक शर्मा आणि वरूण चक्रवर्ती या सामन्यात खेळणार आहेत.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना जिंकायचा असेल तर भारतीय संघाला 200 पार धावा करणं आवश्यक आहे. कारण ही खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे. या खेळपट्टीवर 170-180 धावा आरामात गाठू शकतात. त्यामुळे भारतीय गोलंदाजांवर दुसऱ्या डावात दडपण येऊ शकते. त्यामुळे भारतीय फलंदाजांना चांगली सुरूवात करणं गरजेचं आहे. त्यामुळे धावगती वेगाने वाढेल. हा सामना 200 पार धावांचा झाला तरी इंग्लंडसारखी स्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल