AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | भाऊ कदम स्क्रिप्ट कशी पाठ करतात माहितेय? पाहा कुशल बद्रिकेने शेअर केलेला खास व्हिडीओ!

अनेकदा भाऊ कदम ‘स्क्रिप्ट विसरलो’ किंवा ‘स्क्रिप्ट पाठांतर नाही’, असं म्हणत पंच काढतात, आणि प्रेक्षकही विनोद समजून त्यावर खळखळून हसतात. मात्र, भाऊ कदम खरंच स्क्रिप्ट कसे पाठ करतात, हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का?

Video | भाऊ कदम स्क्रिप्ट कशी पाठ करतात माहितेय? पाहा कुशल बद्रिकेने शेअर केलेला खास व्हिडीओ!
भाऊ कदम
| Edited By: | Updated on: Apr 07, 2021 | 8:12 AM
Share

मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hava Yeu Dya) हा संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा कार्यक्रम रसिकांसाठी नेहमीच खुमासदार मनोरंजनाची मेजवानी घेऊन येतो. ‘चला हवा येऊ  द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. ही कथाबाह्य मालिका सुरुवातीपासूनच लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. भाऊ कदम (Bhau Kadam) असो वा सागर कारंडे (Sagar Karande), श्रेया बुगडे (Shreya Bugade) असो किंवा नव्याने आलेली स्नेहल शिदम (Snehal Shidam) कार्यक्रमातले सर्वच विनोदवीर एकापेक्षा एक आहेत, ‘चला हवा येऊ द्या‘च्या सेटवर नेहमी मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांची लगबग असते. या सगळ्यात धमाल उडवून देतो तो भाऊचा विसरभोळेपणा!(Chala Hava Yeu Dya fame Kushal Badrike share  bhau kadam script reading video)

अनेकदा भाऊ कदम ‘स्क्रिप्ट विसरलो’ किंवा ‘स्क्रिप्ट पाठांतर नाही’, असं म्हणत पंच काढतात, आणि प्रेक्षकही विनोद समजून त्यावर खळखळून हसतात. मात्र, भाऊ कदम खरंच स्क्रिप्ट कसे पाठ करतात, हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? मग कुशल बद्रिकेने (Kushal Badrike) शेअर केलेला हा धमाल व्हिडीओ पाहा.

पाहा कुशलचा व्हिडीओ :

भाऊ ऑफस्क्रिन स्कीटच्या तयारीसाठी पाठांतर कसे करतात, हे या व्हिडीओत पाहायला मिळते आहे. हा मजेशीर व्हिडीओ कुशल बद्रिकेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

या व्हिडीओत भाऊ कदम स्क्रिप्ट वाचताना झोपलेले पाहायला मिळतायत. तर, भाऊला झोपलेले पाहुन कुशल त्यांना त्यांना विचारतो, ‘भाऊ झोपत का नाहीस आरामात?’  हे विचारताच ‘नाही रे, पाठांतर करतोय’, असे उत्तर देत भाऊ कदम पुन्हा झोपी जातात. या गंमतीचा कुशलने एक व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत कुशल पोस्टमध्ये गमतीत लिहीतो की, ‘भाऊ कदम यांच पाठांतर चालू आहे, सगळ्यांनी शांत रहा’. या व्हिडीओवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स पाऊस पडत आहे (Chala Hava Yeu Dya fame Kushal Badrike share  bhau kadam script reading video).

कुशल आणि भाऊचे खास नाते!

‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून कुशल बद्रिके आणि भाऊ कदमची जोडी नेहमीच सर्वांना खळखळून हसवते. कधी सीआयडीमधले इन्स्पेक्टर बनून, बनून तर कधी सासू-सूना बनून या जोडीने धम्माल उडवून दिली आहे. या लाडक्या जोडीतील कुशलने काही दिवसांपूर्वी भाऊच्या वाढदिवसानिमित्त फोटो आणि एक छानशी पोस्ट लिहित लाडक्या दोस्ताला खास शुभेच्छा दिल्या होत्या. ‘सलामत रहे दोस्ताना हमारा’ म्हणत कुशलने भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

(Chala Hava Yeu Dya fame Kushal Badrike share  bhau kadam script reading video)

हेही वाचा :

Katrina Kaif Corona Positive | कतरिना कैफही कोरोनाच्या विळख्यात, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती!

PHOTO | धर्मेंद्र ते माधुरी दीक्षित, ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी सहकाऱ्यांच्या मृत्यूनंतर घेतली त्यांची जागा!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.