Holi 2021 | पांढरा शर्ट पाहून लहान मुलं म्हणाली ‘होली है’, रंग पाहताच श्रद्धा कपूरने काढला पळ!

Holi 2021 | पांढरा शर्ट पाहून लहान मुलं म्हणाली ‘होली है’, रंग पाहताच श्रद्धा कपूरने काढला पळ!
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूरला पाहून काही लहान मुले तिला होळीच्या शुभेच्छा देत, हातातील रंग भरलेल्या फुग्यांनी होळी खेळण्यासाठी ओरडत होते. श्रद्धा कपूर या मुलांचा कल्ला ऐकून घाबरली आणि मुलांकडे पाहून त्यांना रंग लावू नका असे सांगत, तिथून पळ काढला.

Harshada Bhirvandekar

|

Mar 28, 2021 | 1:47 PM

मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) गेल्या काही दिवसांत तिच्या व्यावसायिक जीवनापेक्षा वैयक्तिक जीवनामुळे अधिक चर्चेत आहे. बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठसोबत (Rohan Shreshatha) अभिनेत्रीची जवळीक चर्चेचा विषय बनली आहे. श्रद्धा रोहन सोबत चुलत भाऊ प्रियांक शर्माच्या लग्नात देखील सामील झाली होती. या सोहळ्यातील दोघांचे काही व्हिडीओ आणि काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले होते. दरम्यान, श्रद्धा कपूरचा आणखी एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ज्यामध्ये होळी खेळत असलेल्या लहान मुलांना घाबरून पळ काढणारी श्रद्धा कपूर चांगलीच चर्चेत आली आहे (Bollywood Actress Shraddha Kapoor denied to play holi with childrens).

श्रद्धा कपूरचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी शेअर केला आहे. श्रद्धा कपूरला पाहून काही लहान मुले तिला होळीच्या शुभेच्छा देत, हातातील रंग भरलेल्या फुग्यांनी होळी खेळण्यासाठी ओरडत होते. श्रद्धा कपूर या मुलांचा कल्ला ऐकून घाबरली आणि मुलांकडे पाहून त्यांना रंग लावू नका असे सांगत, तिथून पळ काढला. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा श्रद्धाचा व्हिडीओ :

या व्हिडीओमध्ये श्रद्धा कपूर फेरीमधून बाहेर पडताना दिसत आहे. होळीचा सण जवळ आला असल्याने, तिथे उभी असलेली काही मुले श्रद्धा कपूरला त्यांच्यासोबत होळी खेळण्यास सांगतात, ज्यावर श्रद्धा आणि तिचे अंगरक्षक सावध होतात आणि पटकन तिथून पळ काढतात. व्हिडीओमध्ये श्रद्धा पांढरा शर्ट आणि काळी पँट परिधान केलेली दिसली. ज्यामध्ये तीही खूप स्टायलिश दिसत आहे (Bollywood Actress Shraddha Kapoor denied to play holi with childrens).

रोहन-श्रद्धाची जोडी चर्चेत

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री श्रद्धा कपूर आजकाल आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूपच व्यस्त आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार श्रद्धा कपूर सध्या रोहन श्रेष्ठला डेट करत आहे. पण अद्याप या जोडीने एकमेकांबद्दल किंवा या नात्याबद्दल कधीही उघडपणे चर्चा केलेली नाही. पण बर्‍याचदा या कपलने मुंबईत एकत्र वेळ घालवला आहे. त्याचवेळी काही दिवसांपूर्वी या जोडप्याच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावरही खूप चर्चिली जात होती.

शक्ती कपूर म्हणतात…

शक्ती कपूरला जेव्हा श्रद्धाच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारले गेले तेव्हा ते म्हणाले होते की, ‘श्रद्धाच्या लग्नाविषयी ज्या काही गोष्टी ऐकायला मिळत आहेत, त्या फक्त अफवाच आहेत. पुढच्या 4-5 वर्षांनंतर श्रद्धा लग्नाचा विचार करू शकते. सध्या तिच्याकडे बरेच मोठे चित्रपट आहेत आणि तिला तिचे लक्ष या चित्रपटांवर केंद्रित करायचे आहे’. शक्ती कपूर यांनी श्रद्धाच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलताना म्हटले होते की, ‘रोहन एक चांगला मुलगा आहे. तो लहानपणापासूनच आमच्या घरी येत होता. श्रद्धाने मला त्यांच्या लग्नाविषयी काहीही सांगितले नाही. आणि ते दोघंही खूप चांगले मित्र आहेत.’

(Bollywood Actress Shraddha Kapoor denied to play holi with childrens)

हेही वाचा :

PHOTO | ‘गाढवाचं लग्न’मधील ‘गंगी’ आता कशी दिसते?

संजय लीला भन्साळींच्या चित्रपटाला ‘मस्तानी’चा नकार, दीपिका-भन्साळींमध्ये कोल्डवॉर सुरु!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें