AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तमन्ना भाटियाच्या या गाण्याने रचला इतिहास, यूट्यूबवर 100 कोटींपेक्षा जास्त व्हूज, कोणतं आहे ते गाणं?

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या डान्सचे लाखो चाहते आहेत. नुकतेच तिच्या एका गाण्याने यूट्यूबवर 1 बिलियनपेक्षा जास्त व्हूज मिळवले असून त्याने इतिहास रचला आहे.

तमन्ना भाटियाच्या या गाण्याने रचला इतिहास, यूट्यूबवर 100 कोटींपेक्षा जास्त व्हूज, कोणतं आहे ते गाणं?
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 17, 2026 | 5:03 PM
Share

Bollywood Actress : सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मात्र, यामधील काही चित्रपट असे आहेत की ज्यांमधील गाणी इतकी प्रसिद्ध झाली की ती एका रात्रीत सुपरहिट ठरली. ही गाणी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली. अशातच आता आणखी एका गाण्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे. या गाण्याने तब्बल 1 अब्ज व्हूयूज मिळवले असून तो लाखो चाहत्यांचं आवडतं गाणं आहे.

दरम्यान, हे गाणं बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जिने आपल्या दमदार अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. तिचे नाव तमन्ना भाटिया आहे. सध्या ती खूप चर्चेत आहे. अनेक चित्रपटांमधील तिच्या आयटम साँग्सला आणि तिच्या डान्सला प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे. याच प्रेमाचा मोठा पुरावा म्हणजे तिच्या एका गाण्याने यूट्यूबवर 1 अब्ज (1000 मिलियन) व्ह्यूजचा टप्पा गाठला आहे. हा एक मोठा विक्रम आहे.

तमन्नाने शेअर केला व्हिडीओ

हे गाणे म्हणजे 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट चित्रपट ‘स्त्री 2’ मधील ‘आज की रात’. या गाण्यात तमन्ना भाटियाने केलेला आयटम डान्स प्रचंड व्हायरल झाला होता. सोशल मीडियापासून ते यूट्यूबपर्यंत या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आणि आता अधिकृतपणे 1 अब्जांहून अधिक व्ह्यूज मिळवत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

या यशाने भारावून गेलेल्या तमन्ना भाटियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एका व्हिडिओद्वारे 1 व्ह्यूजपासून 1 अब्ज व्ह्यूजपर्यंतचा प्रवास दाखवला आहे. कॅप्शनमध्ये तिने आपल्या चाहत्यांचे मनापासून आभार मानत मिळालेल्या प्रेमासाठी ‘Thank You’ असे लिहिले आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

स्त्री 2 चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद

दरम्यान, ‘स्त्री 2’ हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर त्याने जबरदस्त कामगिरी केली. या चित्रपटाने हिंदी बॉक्स ऑफिसवर 600 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय आणि गाणी यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

उल्लेखनीय म्हणजे ‘स्त्री 2’ हा 2018 साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट चित्रपट ‘स्त्री’चा सिक्वेल आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर प्रेक्षक या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते आणि ‘स्त्री 2’ ने ती अपेक्षा पूर्ण करत मोठे यश मिळवले.

“तुम्ही सत्तेत बसा, आम्ही बघतोच”किशोरी पेडणेकरांचा महायुतीला थेट इशारा
“तुम्ही सत्तेत बसा, आम्ही बघतोच”किशोरी पेडणेकरांचा महायुतीला थेट इशारा.
निकालाच्या दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर
निकालाच्या दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर.
बीएमसी निवडणुकीच्या स्ट्राईक रेटमध्येही भाजपची बाजी
बीएमसी निवडणुकीच्या स्ट्राईक रेटमध्येही भाजपची बाजी.
मुंबईचा महापौर हा... भाजपचे मंत्री नितेश राणेंनी दिले मोठे संकेत
मुंबईचा महापौर हा... भाजपचे मंत्री नितेश राणेंनी दिले मोठे संकेत.
अमरावतीत भाजप कुबड्या... काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल
अमरावतीत भाजप कुबड्या... काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल.
'संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच ठाकरेंची अवगती होतेय'
'संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच ठाकरेंची अवगती होतेय'.
महापालिका निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; त्या गोष्टीवर ठेवलं बोट
महापालिका निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; त्या गोष्टीवर ठेवलं बोट.
महिलेलाच महापौर करा... शिंदे गटाच्या महिला नेत्याची मागणी
महिलेलाच महापौर करा... शिंदे गटाच्या महिला नेत्याची मागणी.
महापालिका निकालानंतर संजय राऊतांचा विरोधकांना थेट इशारा
महापालिका निकालानंतर संजय राऊतांचा विरोधकांना थेट इशारा.
आधी मागे पडले, नंतर अचानक... कोण ठरलं खरा ठाणेदार?
आधी मागे पडले, नंतर अचानक... कोण ठरलं खरा ठाणेदार?.