AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय हिने सोडले अभिषेक बच्चनचे घर?, अखेर घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अत्यंत मोठा खुलासा, वाद…

Aishwarya Rai and Abhishek Bachchan divorce : गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा रंगताना दिसतंय की, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात वाद सुरू आहे. हेच नाहीतर अभिषेक बच्चन याचे घर सोडून ऐश्वर्या माहेरी गेल्याचेही सातत्याने सांगितले जातंय. अंबानीच्या पार्टीतही ऐश्वर्या मुलीसोबत दाखल झाली.

ऐश्वर्या राय हिने सोडले अभिषेक बच्चनचे घर?, अखेर घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अत्यंत मोठा खुलासा, वाद...
Aishwarya Rai and Abhishek Bachchan
| Updated on: Jul 24, 2024 | 12:31 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांमुळे तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय हिच्या आयुष्यात मोठे वादळ आले असून तिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचे सांगितले जात आहे. हेच नाहीतर लवकरच ती घटस्फोट घेणार आहे, अशी चर्चा आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला बच्चन कुटुंबासोबत न येता ऐश्वर्या राय ही लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत पोहोचली. ज्यानंतर घटस्फोटाच्या चर्चा अधिकच रंगताना दिसल्या. आता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात वाद नेमक्या कोणत्या कारणामुळे सुरू आहे, याबद्दल अत्यंत मोठा खुलासा हा करण्यात आलाय. ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या संपर्कात देखील नाहीये.

अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले की, माझी सर्व संपत्ती मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन यांची असेल. हेच नाहीतर काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी त्यांचा प्रतिक्षा हा बंगला थेट श्वेता हिच्या नावावर केला. काही वर्षांपासून श्वेता बच्चन ही तिच्या पतीसोबत राहात नाहीतर अमिताभ बच्चन यांच्यासोबतच त्यांच्या जलसा या बंगल्यावरच आपल्या मुलांसोबत राहाते.

मुळात म्हणजे ऐश्वर्या राय हिला हीच गोष्ट अजिबात आवडत नाही. श्वेता बच्चन ही जलसा बंगल्यात राहात असल्याने ती नाराज आहे. यामुळेच ऐश्वर्या राय हिने जलसा बंगला सोडत आपले माहेर गाठले आहे. बच्चन कुटुंबांपैकी अभिषेक बच्चन हा सोडला तर इतर ती कोणाला अजिबात बोलत देखील नाही. जलवा बंगल्यातून ऐश्वर्या ही एकटीच नाही गेली तर ती आपल्या मुलीला देखील सोबत घेऊन गेलीये.

श्वेता बच्चन हिच्यामुळेच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील वाद वाढल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वीच काही फोटो व्हायरल झाले. त्या फोटोमध्ये श्वेता बच्चन ही बच्चन कुटुंबासोबत फोटोसाठी पोज देतानाही दोघींचे चेहरे बरेच काही सांगून जाताना दिसले. ऐश्वर्या रायही श्वेता बच्चन हिच्यामुळेच बच्चन कुटुंबांपासून दूर राहात असल्याचे सांगितले जातंय. लवकरच अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय घटस्फोट घेतील, असेही रिपोर्टमध्ये सांगितले.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातील फोटो व्हायरल झाल्याने बच्चन कुटुंबात सर्वकाही ठिक नसल्याचे अगोदरच स्पष्ट झाले. त्यामध्ये अनंत अंबानीच्या लग्नाचे सर्व फंक्शन झाल्यानंतर ऐश्वर्या राय ही थेट मुलगी आराध्या बच्चन हिला घेऊन विदेशात गेली. कोणतेही फंक्शन असो किंवा पार्टी ऐश्वर्या राय ही एकटी किंवा आपल्या मुलीसोबत दाखल होते. बच्चन कुटुंबासोबत ती कधीच दाखल होत नाही.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ