अनेक महिलांसोबत पतीच्या ‘वन नाईट स्टँड’ला प्रचंड कंटाळली होती अभिनेत्री; घेतला मोठा निर्णय
अनेक महिलांसोबत पतीच्या 'वन नाईट स्टँड'ला प्रचंड कंटाळलेली अभिनेत्री म्हणाली, 'किती दिवस असं चालणार हेच...', अखेर तिने घेतला मोठा निर्णय

मुंबई | बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांचं लग्नानंतर देखील इतर महिलांसोबत अफेअर होते. पतीच्या विवाबबाह्य संबंधांना कंटाळून अनेक सेलिब्रिटींच्या पत्नींनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. तर अनेक सेलिब्रिटींच्या पत्नींनी घटस्फोट देत दुसऱ्या पतीसोबत संसार थाटला. पण बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने कधीही पतीची साथ सोडली नाही. अभिनेत्रीला माहिती होतं, की पतीचे अनेक महिलांसोबत संबंध आहेत, पण आपला पती आपल्याशिवाय राहू शकत नाही…अशी खात्री देखील अभिनेत्रीला होती. त्यामुळे पतीचे इतर महिलांसोबत असणारे नाते किती दिवस टिकून राहतात हेच अभिनेत्रीला पाहायचं होतं. एवढंच नाही अभिनेत्रीच्या पतीच्या अफेअरबद्दल सर्वांना कळालं होतं. अनेक चर्चा देखील रंगल्या…
पतीच्या अनेक अफेअरबद्दल अभिनेत्रीच्या मित्रांनी देखील सांगितलं. पण बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने कोणत्याही रंगणाऱ्या चर्चांकडे अधिक लक्ष दिलं नाही. पण अभिनेत्रीने एका मुलाखतीत पतीच्या ‘वन नाईट स्टँड’बद्दल मोठं रहस्य उघड केलं. सध्या बॉलिवूडच्या ज्या कपलची चर्चा रंगत आहे, ते कपल दुसरं तिसरं कोणी नसून दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू कपूर आहेत.
पतीच्या ‘वन नाईट स्टँड’बद्दल सांगताना नीतू कपूर म्हणाला, ‘ऋषी कपूर यांच्या प्रत्येक अफेअरबद्दल मला माहिती होतं. ‘वन नाईट स्टँड’ पर्यंत त्यांचे महिलांसोबत संबंध होते. त्यांना इतर महिलांसोबत फ्लर्ट करताना मी पाहिलं आहे. ऋषी यांच्या ‘वन नाईट स्टँड’मुळे लग्नाच्या दोन वर्षांपर्यंत आमच्या भांडणं झाली.
पुढे नीतू कपूर म्हणाल्या, ‘हे सगळं किती दिवस चालणार हेच मला पहायचं होतं. ऋषी यांना कायम प्रश्न पडायचा, मला त्यांच्या अफेअरबद्दल कसं समजतं.. इंडस्ट्रीमध्ये माझी देखील ओळख आणि मित्र असल्यामुळे ऋषी यांच्याबद्दलची छोटी गोष्ट देखील माझ्यापर्यंत यायची…’
अखेर नीतू कपूर यांनी पुरुषांच्या स्वतंत्र्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. ‘पुरुषांना थोडं स्वतंत्र द्यायला हवं, फ्लर्ट करणं त्यांच्या स्वभावात असतं. पुरुषांना कोणी बांधून ठेवू शकत नाही. पण जर दुसऱ्या महिलेसोबत नातं फार पुढे गेलं असेल तर, मी त्यांना घराबाहेर काढलं असतं आणि म्हणाली असती जा तिच्यासोबतच राहा…’ आज नीतू कपूर यांचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र त्यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगत आहेत.
नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलाचं नाव रणबीर कपूर तर, मुलीचं नाव रिद्धिमा कपूर असं आहे… २०२० साली कर्करोगामुळे ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला.
