Raghav Juyal: पर्वताच्या टोकावर तिने Kiss केलं आणि…, राघव जुयालकडून मोठा खुलासा
Raghav Juyal: राघव जुयालसोबत घडलेली ती घटना... कॉजेल झाल्यानंतर 'ती' राघवला पर्वताच्या टोकावर घेवून गेली, किस केलं त्यानंतर अभिनेता मात्र..., सध्या सर्वत्र अभिनेता आणि डान्सर राघव जुयाल याने सांगितलेल्या घटनेची चर्चा...

अभिनेता आणि डान्सर राघव जुयाल याला आता कोणत्या ओळखीची गरज नाही. डान्सच्या जोरावर राघव याने स्वतःची ओळख निर्माण केली. राघव सध्या ‘किल’ सिनेमाच्या यशाचा आनंद अनुभवत आहे. कायम कॉमेडी करणारा राघव सिनेमात गंभीर भूमिका साकारताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राघव याची चर्चा रंगली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राघव याने स्वतःच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं. एवढंच नाही तर, अभिनेत्याने पहिल्या किसबद्दल सांगितलं आहे.
राघव जुयाल म्हणाला, ‘माझ्या अनेक गर्लफ्रेंड्स झाल्या आहेत. जेव्हा माझी पहिली गर्लफ्रेंड झाली होती, तेव्हा मला याविषयातील फार काही कळत नव्हतं. तेव्हा मी कच्चा होतो…’ पुढे राघवने त्याच्या पहिल्या किसबद्दल सांगितलं, ‘ती मला कायम टेडी बियर द्यायची…. तिच्यासोबत माझी पहिली किस होती… तेव्हा मी 12 वीमध्ये होतो…’
View this post on Instagram
‘आम्ही कॉलेज झाल्यानंतर मसूरी गेलो होतो. तेथे रोपवे आहे…. जेव्हा तुम्ही पर्वताच्या टोकावर पोहोचता, त्याआधी एक जागा आहे तिथे आम्ही किस केलं होतं. पहिल्यांदा किस केल्यानंतर मी घाबरलो… डॉक्टर तपासतात तेव्हा भीती वाटते, तशी भीती माझ्या मनात होती…’
‘किस झाल्यानंतर मला काही कळत नव्हतं… तेव्हा ती हसायला लागली आणि म्हणाली तुला किसपण करता येत नाही… ही फार जुनी गोष्ट आहे…’ असं देखील राघव म्हणाला… सध्या सर्वत्र राघव जुयाल आणि त्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपूर्वी राघव जुयाल याचं नाव अभिनेत्री शहनाज गिल हिच्यासोबत जोडलं जात होतं. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं होतं. पण दोघांनी देखील आम्ही चांगले मित्र आहोत… असं सांगत रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
राघव जुयाल आणि शहनाज गिल यांनी अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही. पण सिनेमातील नव्या कलाकारांना ओळख मिळाली.
