AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुन्नाभाई MBBS मधील स्वामीला ओळखणं कठीण, अवस्था पाहून चाहते भावूक

Munna Bhai MBBS: 'हे असं काय झालंय...', मुन्नाभाई MBBS मधील सडपातळ स्वामीला ओळखणं आता कठीण... अभिनेत्याला पाहून चाहते भावूक..., अनेक वर्षानंतर फोटो आलाय समोर, सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा...

मुन्नाभाई MBBS मधील स्वामीला ओळखणं कठीण, अवस्था पाहून चाहते भावूक
| Updated on: Jul 24, 2024 | 11:07 AM
Share

Munna Bhai MBBS: बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी काही सिनेमांमध्ये काम केल्यानंतर अभिनय विश्वाचा निरोप घेतला. याच सेलिब्रिटींपैकी असे काही सेलिब्रिटी आहेत,ज्यांना चाहते आजपर्यंत विसरू शकलेले नाहीत. अशाच एका अभिनेत्यापैकी एक म्हणजे ‘मुन्नाभाई MBBS’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आलेला ‘स्वामी..’ अभिनेता खुर्शीद लॉयर याने ‘मुन्नाभाई MBBS’ सिनेमात ‘स्वामी’ ही भूमिका साकारली होती. भूमिकेला चाहत्यांनी भरभरुन प्रेम देखील दिलं. ‘मुन्नाभाई MBBS’ सिनेमातील खुर्शीद लॉयर याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आज देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

आता देखील खुर्शीद लॉयर याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्याचे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. इतक्या वर्षांनंतर अभिनेत्याला ओळखणं देखील कठीण झालं आहे. सिनेमात सडपातळ दिसणारा खुर्शीद लॉयर आता फार वेगळा दिसते.

विरल भयानी याच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून खुर्शीद लॉयर याचे फोटो पोस्ट करण्यात आले आहे. विरल भयानीने खुर्शीद लॉयर याचे फोटो पोस्ट करत अभिनेत्याबद्दल महत्त्वाची माहिती देखील दिली आहे. ‘तिग्मांशू धुलियाच्या हॉटस्टार वरील the great indian murder च्या माध्यमातून खुर्शीद लॉयर याने अभिनय विश्वात पुन्हा पदार्पण केलं आहे.’

‘खुर्शीद लॉयर आजही मुन्नाभाई MBBS सिनेमातील त्याच्या स्वामी या भूमिकेमुळे लोकांच्या लक्षात आहे.’ खुर्शीद लॉयर याने ‘मुन्नाभाई MBBS’ सिनेमा शिवाय ‘अजब प्रेम की गजब कहीणी’, ‘प्यारे मोहन’, ‘डबल धमाल’, ‘बुड्ढा मर गया’, यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता चाहते अभिनेत्याच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत आहेत.

खुर्शीद लॉयर याच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘स्वामीची भूमिकेत मस्त होता….’ शिवाय कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी स्वामी भूमिकेत असलेल्या खुर्शीद लॉयर याचे डायलॉग देखील लिहिले आहेत.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त खुर्शीद लॉयर याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. तर अनेक वर्षांनंतर अभिनेत्याला पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील आनंद झाला आहे.

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.