ब्रेकअपची चर्चा असतानाच मलायका अरोरा हिचे ‘ते’ फोटो व्हायरल, डोक्यावर टोपी, काळे जॅकेट आणि…
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. मलायका ही नुकताच भारतात परतलीये.

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा हिने 2017 मध्ये अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतला. अरबाज खान याच्या घटस्फोटानंतर मलायका ही बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. दोघेही एकमेकांचे खास फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा ही सातत्याने रंगताना दिसत आहे. दोघांचे ब्रेकअप झाले असून दोघे विभक्त झाल्याचे सांगितले जातंय.
सतत अर्जुन कपूर याच्यासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चा असतानाच आता मलायका अरोरा ही विदेशात गेली होती. विशेष म्हणजे खास व्यक्तीसोबत विदेशात वेळ घालवतानाही मलायका अरोरा दिसली. मलायका अरोरा हिने विदेशातून काही खास फोटो शेअर केले. बिकिनीमध्ये अत्यंत जबरदस्त अशा लूकमध्ये मलायका अरोरा ही दिसली.
मलायका अरोरा हिने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसले. दुसरीकडे मलायका अरोरा ही विदेशात गेल्यानंतर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात धमाका करताना अर्जुन कपूर हा दिसला. नेहमीच अर्जुन कपूरसोबत विदेशात जाणारी मलायका एकटीच गेल्याने सर्वजण हैराण झाले.
आता नुकताच मलायका अरोरा हिचे मुंबई एअरपोर्टवरील काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये मलायका अरोरा ही काळे जॅकेट, टोपी आणि बेहाल आणि शांत दिसली. मलायका अरोरा ही नेहमीच पापाराझी यांना फोटोसाठी पोझ देते. मात्र, पहिल्यांदा असे झाले की, मलायका अरोरा ही पापाराझी यांना फोटोसाठी पोझ न देता निघून गेली.
हेच नाहीतर मलायका अरोरा आणि तिचा मुलगा अरहान खान हे चेहरा लपवताना देखील दिसले. मलायका अरोरा ही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर मलायका अरोराची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे. मलायका अरोरा चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते.
