AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘प्रेमाला वय नसतं’,आमिर खानच्या आधी या सेलिब्रिटींनी वयाच्या 60 अन् 70 वर्षांत केलं लग्न; म्हातारपणी झालं खरं प्रेम

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी वयाच्या साठ आणि सत्तरच्या दशकात लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. आमिर खान वयाच्या 60 व्या वर्षी पुन्हा प्रेमात पडला असून त्याच्या नव्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा आहेत. पण आमिरसारखे असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी वयाच्या 60 अन् 70 वर्षांत लग्न केलं. या सेलिब्रिटींना म्हातारपणी खरं प्रेम झालंय. 

'प्रेमाला वय नसतं',आमिर खानच्या आधी या सेलिब्रिटींनी वयाच्या 60 अन् 70 वर्षांत केलं लग्न; म्हातारपणी झालं खरं प्रेम
Bollywood Celebs Marrying in Their 60s & 70s Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 21, 2025 | 12:07 PM
Share

आमिर खान सध्या त्याच्या नवीन अफेअरमुळे चर्चेत आहे. गौरी स्प्राटसोबतची त्याचं नात आता फार चर्चेत आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या वयातील अंतरामुळे या दोघांनाही ट्रोल केलं जात आहे. पण आमिर खान आणि गौरी स्प्राट हीच जोडी अशी नाहीये की ज्यांच्या वयात बरीच तफावत आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांनी चक्क वयाच्या 60 अन् 70 वर्षांत लग्न केलं आहे. ज्यांना वयाच्या 70मध्येही प्रेम झालं आहे.

ते म्हणतात ना प्रेमाला वयाचं बंधन नसतं असंच काहीस या सर्व सेलिब्रिटींसोबत घडल आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे म्हातारपणात प्रेमात पडले. चला पाहुयात त्या जोड्या कोणत्या आहेत त्या.

सेलिब्रिटींनी 60 अन् 70 वर्षांत केलं लग्न

कबीर बेदी: या यादीत पहिले नाव कबीर बेदी यांचे आहे. तीन अयशस्वी लग्नांनंतर, कबीर बेदी यांनी त्यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी चौथ्यांदा लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. कबीर बेदी यांची चौथी पत्नी परवीन दोसांझ आहे, जी त्यांची मुलगी पूजा बेदीपेक्षा फक्त 3 ते 4 वर्षांनी लहान आहे. कबीर आणि परवीन यांच्या वयात 30 वर्षांचा फरक आहे. कबीर यांना चौथ्या लग्नानंतर बरंच ट्रोल केलं गेलं आहे.

नीना गुप्ता: त्यानंतर दुसरं नाव आहे अभिनेत्री नीना गुप्ता. नीना गुप्ताही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. त्या विवियन रिचर्ड्ससोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होत्या तेव्हा. तेव्हा त्या दोघांना एक मुलगीही झाली. पण ते दोघेही नंतर वेगळे झाले. मग नीना यांनी लेकीला एकटीनेच वाढवले. त्यानंतर त्यांनी वयाच्या 54 व्या वर्षी विवेक मेहरासोबत लग्न केलं.

हंसल मेहता: चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांनी देखील वयाच्या 54 व्या वर्षी सैफीना हुसेनशी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. 17 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मिलिंद सोमण: फिटनेस फ्रीक मिलिंद सोमणने वयाच्या 52 व्या वर्षी त्याच्यापेक्षा 26 वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोंवरशी लग्न केले. दोघांच्या लग्नाची बरीच चर्चाही झाली होती.

आशिष विद्यार्थी : दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी गुपचूप दुसरं लग्न केलं. ते आसाममधील रहिवासी असून रूपाली बरुआसोबत लग्न केलं. रुपालीपूर्वी आशिषचे लग्न अभिनेत्री राजोशी विद्यार्थीशी झाले होते.

मनोज तिवारी: भोजपुरी चित्रपट अभिनेता, गायक आणि राजकारणी मनोज तिवारी यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर 2020 मध्ये सुरभी तिवारीशी दुसरं लग्न केलं. त्यावेळी त्यांचे वय 50 वर्ष होते.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.