पांढऱ्या केसांमुळे करण जोहरची थट्टा, वाढदिनी नवा लूक प्रेक्षकांसमोर

दिग्दर्शक करण जोहरने नुकतंच स्वतःचा एक वेगळाच ‘लूक’ असलेला व्हिडिओ ‘इन्स्टाग्राम’च्या ‘प्रोफाईल’वर पोस्ट केला आहे. Karan Johar New Look

पांढऱ्या केसांमुळे करण जोहरची थट्टा, वाढदिनी नवा लूक प्रेक्षकांसमोर

मुंबई : दिग्दर्शक करण जोहर नेहमीच त्याच्या सहवासाने सर्वांना आनंद देत (Karan Johar New Look) असतो. करणने नुकतंच स्वतःचा एक वेगळाच ‘लूक’ असलेला व्हिडिओ ‘इन्स्टाग्राम’च्या ‘प्रोफाईल’वर पोस्ट केला आहे. या व्हिडीओ त्याने स्वत: चे पांढरे केस घरच्या घरी रंगवलेले दिसत आहे. म्हातारा म्हणवून घेण्याचा कंटाळा आलेल्या करणने देशातील सर्वात आघाडीचा क्रीम हेअर कलर ब्रॅंड असलेल्या ‘गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम’च्या सहाय्याने घरच्या घरी स्वतःच केस रंगवले आहेत. ‘#कलरलाइककरण’ असा ‘हॅशटॅग’ही त्याने वापरला आहे.

सध्या लॉकडाऊनमध्ये अनेकजणांनी आपल्या केसांकडे दुर्लक्ष केले आहे. आपले (Karan Johar New Look) केस पांढरे आहेत, हेही अनेकजण जणू विसरून गेले आहेत. करणचीही मानसिकता अशीच झाली होती. करणने 5 मे रोजी आपला पांढऱ्या केसांसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यात त्याने यापुढे आपल्याला केवळ वडिलांच्या भूमिका कराव्या लागणार असल्याचे म्हटले होते. या फोटोमुळे एकता कपूर, फराह खान, विशाल दादलानी, शिल्पा शेट्टी यांसारखे बॉलिवूडमधील अनेकजण गोंधळात पडले. तर काहीजण गंभीर झाले, तर काहींनी थट्टामस्करी सुरु केली.

मात्र या सर्व प्रतिक्रिया फॅशनप्रेमी असलेल्या करणला मान्य नव्हत्या. त्यामुळे त्याने स्वतःच यावर मार्ग काढत गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीमद्वारे ‘घरीच केस रंगवणे किती सोपे असते हे दाखवून दिले. विशेष म्हणजे काल करणने आपला वाढदिवस साजरा केला.

पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये करण जोहर काळ्या केसांसह दर्शकांच्या समोर आला आहे. करणने गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीमने केस रंगवले. ‘मिसळा, लावा आणि धुवून टाका.’ याद्वारे त्याने केसांना काळा रंग केला.

“पांढऱ्या केसांमुळे अनेक प्रतिक्रिया व्यक्त होतात. ‘खूपच भारी’ ते ‘हॅलो अंकल’पर्यंतच्या सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया मी अनुभवल्या. मी म्हातारा का दिसतोय, असे माझ्या मुलांनी विचारल्यावर मी घरीच केस रंगवण्याचा प्रयत्न करायचे ठरवले. त्यासाठी मला फार काही करावे लागले नाही. घरी लावण्याजोगा, नैसर्गिक घटक असलेला रंग मला मिळाला आणि माझे काम झाले.’’ असे करण जोहर म्हणाला.

त्यामुळे आता करणच्या नव्या लूकविषयी इतर कलाकार काय म्हणतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार (Karan Johar New Look) आहे.

संबंधित बातम्या : 

करण जोहरकडे घरकाम करणाऱ्या दोघांना ‘कोरोना’ची लागण

सलमान खानची नव्या क्षेत्रात उडी, ग्रूमिंग ब्रँड लाँच, सॅनिटायझरची निर्मिती

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *