Vivek Agnihotri | कमर्शियल सिनेमांपासून दूर असूनही विवेक अग्निहोत्री कमावतात कोट्यवधी रुपये; आकडा हैराण करणारा
Vivek Agnihotri | दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या कमाईचा आकडा थक्क करणारा; कमी बजेट असलेल्या सिनेमांमधून कमावतात कोट्यवधींची माया... सध्या सर्वत्र विवेक अग्निहोत्री यांच्या संपत्तीची चर्चा...

मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : ‘द कश्मीर फाईल्स’, ‘द व्हॅक्सिन वॉर’, ‘हेट स्टोरी’, ‘द दिल्ली फाईल्स’, ‘द लास्ट शो’ यांसारख्या अनेक सिनेमांचं दिग्दर्शन करत दिग्दर्शिक विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. विवेक अग्निहोत्री बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. ‘द कश्मीर फाईल्स’ सिनेमामुळे विवेक अग्निहोत्री तुफान चर्चेत आले. पण आता विवेक अग्निहोत्री ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. सिनेमाचा टीझर देखील प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून विविक अग्निहोत्री कमर्शियल सिनेमांपासून दूर आहेत. सध्या विवेक अग्निहोत्री कमी बजेट असलेले सिनेमे बनवत आहेत. रिपोर्टनुसार, विवेक अग्निहोत्री आता गंडगंज बजेटच्या सिनेमांपासून दूर आहेत, तरी देखील तगडी कमाई करतात.
मिळालेल्या माहितीनुसार, विवेक अग्निहोत्री यांच्याकडे जवळपास ४० कोटी रुपयांची संपत्ती आहे. महत्त्वाचं म्हणजे, विवेक अग्निहोत्री यांनी अनेक सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. ज्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मनित देखील करण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विवेक अग्निहोत्री यांचे सिनेमे आणि संपत्तीची चर्चा रंगत आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी २००५ साली ‘चॉकलेट’ सिनेमाचं दिग्दर्शन करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ‘चॉकलेट’ सिनेमाचं दिग्दर्शन करत विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शनास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. विवेक अग्निहोत्री सध्या ‘द व्हॅक्सिन वॉर’मुळे चर्चेत आहेत.. सिनेमा भारतीय वैज्ञानिकांवर आधारित आहे.
सिनेमात अभिनेत्री पल्लवी जोशी आणि अभिनेता नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एवढंच नाही तर, विवेक अग्नीहोत्री यांनी सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची देखील घोषणा केली आहे. सिनेमा २८ सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विवेक अग्निहोत्री फक्त त्यांच्या सिनेमांमुळेच नाही तर, त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. बॉलिवूड स्टार, घराणेशाही, सिनेमे एवढंच नाही तर राजकारणावर देखील विवेक अग्निहोत्री स्वतःचं परखड मत व्यक्त करतात. ज्यामुळे विवेक अग्निहोत्री यांना टीकेचा देखील सामना करावा लागतो.
