AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अविवाहित रेखा यांचं प्रेग्नेंसीबद्दल मोठं वक्तव्य, सर्वत्र माजली होती खळबळ

Rekha Personal Life: रेखा यांचं खासगी आयुष्याबद्दल बोल्ड वक्तव्य, 'योगायोगाने फक्त प्रेग्नेंसी...', अनेक सेलिब्रिटींसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे अभिनेत्री चर्चेत... आजही रेखा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत...

अविवाहित रेखा यांचं प्रेग्नेंसीबद्दल मोठं वक्तव्य, सर्वत्र माजली होती खळबळ
| Updated on: Nov 27, 2024 | 10:59 AM
Share

Rekha Personal Life: बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा आज झगमगत्या विश्वापासून दूर असल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या वक्तव्यांमुळे चर्चे असतात. रेखा यांनी त्यांच्या काळात एकापेक्षा एक सिनेमात दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण रेखा त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. शिवाय खुद्द रेखा यांनी देखील त्यांच्या खासगी आयुष्यावर अनेक मोठे खुलासे केले आहे. ज्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला.

सांगायचं झालं तर, यासिर उस्मान लिखीत ‘रेखा: कैसी पहेली जिंदगानी’ पुस्तकार अभिनेत्रीच्या आयुष्याबद्दल लिहिलं आहे. रेखा यांच्याबद्दल कोणालाच माहिती नसलेले किस्सा यासिर उस्मान यांच्या पुस्तकात आहेत… एवढंच नाही तर, रेखा यांनी एका मुलाखतीत स्वतःची सेक्स लाईफ आणि प्रेग्नेंसीबद्दल बोल्ड वक्तव्य केलं होतं.

मुलाखतीत रेखा म्हणाल्या होत्या, ‘तुम्ही एका पुरुषाच्या जवळ… अत्यंत जवळ येऊ शकत नाही. जोपर्यंत तुमच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित होत नाहीत.’ शिवाय रेखा यांनी लग्नाआधी शारीरिक संबंधांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं होतं…

रेखा म्हणाल्या होत्या, ‘लग्नाआधी शारीरिक संबंध अत्यंत सामान्य गोष्ट आहे. हायपोक्राइट लोकं म्हणतात की, लग्नानंतरच मुलींनी शारीरिक संबंध ठेवायला हवेत… अशी लोकं काहीही वाचाळ बडबड करत असतात… जिथे एकमेकांवर प्रेम असतं, तिथे शारीरिक संबंध सामान्य गोष्ट आहे… मी अद्याप योगायोगाने प्रेग्नेंट राहिली नाही… असं देखील रेखा म्हणाल्या…

सांगायचं झालं तर, रेखा यांचं नाव अनेक प्रसिद्ध आणि दिग्गज सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याच सेलिब्रिटीसोबत रेखा यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आज वयाच्या 69 व्या वर्षी देखील रेखा एकट्याच आयुष्य जगत आहेत. रेखा यांचं नाव अनेकांसोबत जोडण्यात आलं, पण महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या नात्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.

रेखा यांनी अनेकदा अमिताभ यांच्यासोबत असलेल्या नात्यावर वक्तव्य केलं. पण बिग बी यांनी कधीच रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्याचा स्वीकार केला नाही. रेखा यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, रेखा – मुकेश यांनी लग्न तर केलं, पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण त्याआधीच मुकेश यांनी स्वतःला संपवलं… पहिल्या पतीचं निधन झाल्यानंतर रेखा यांना टीकेचा सामना करावा लागला.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.