AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडला दुसरा मोठा धक्का; प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचं निधन

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या 74 व्या वर्षी किडनी निकामी झाल्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सतीश शाह यांच्या जाण्याने बॉलिवूडने एक हरहुन्नरी कलाकार गमावला आहे.

बॉलिवूडला दुसरा मोठा धक्का; प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचं निधन
Bollywood Icon Satish Shah Passes Away at 74, Kidney Failure Led to DemiseImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 25, 2025 | 4:37 PM
Share

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले आहे. त्यांचे मित्र अशोक पंडित यांनी त्यांच्या निधनाची घोषणा केली. किडनी निकामी झाल्यामुळे त्यांना दादरमधील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे, चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगातील कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

किडनीच्या संबंधित आजाराने ग्रस्त होते 

अभिनेता बऱ्याच काळापासून किडनीच्या संबंधित आजाराने ग्रस्त होते. तसेच त्यांची किडनी प्रत्यारोपण झाल्याचं बोललं जातं,आणि त्यातूनच त्यांना इन्फेक्शन झाले होते. तर काहींच्या मते त्यांची किडनीच निकामी झाल्यामुळे त्यांचा त्रास वाढला आणि त्यांना दादरमधील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

मैं हूं ना, कल हो ना हो, फना, ओम शांति ओम, हम आपके हैं कौन आणि जाने भी दो यारों सारख्या सिनेमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ चरित्र आणि विनोदी अभिनेते सतीश शाह यांचं निधन झालं आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. चारच दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेते असरानी यांचं निधन झालं. त्यानंतर सतीश शाह यांनीही जगाचा निरोप घेतल्याने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.

सतीश शाह हे हरहुन्नरी अभिनेते होते. आपल्या अनोख्या टायमिंगसाठी ते प्रसिद्ध होते. त्यांनी 250च्यावर हिंदी चित्रपटात काम केलं. टीव्ही सीरिअल आणि मराठी सिनेमातही त्यांनी काम केलं होतं. गंमत जंमत या मराठी सिनेमातील त्यांची पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका संस्मरणीय ठरली होती.

कॉमिक रोलमधील टायमिंगमुळे ते अधिकच लोकप्रिय ठरले.

सतीश शाह यांचा जन्म मुंबईतील एका गुजराती कुटुंबात झाला होता. त्यांनी सेंट झेवियर्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर थेट नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातून अभिनयाचे धडे घेतले. सुरुवातीच्या काळात नाटकांमधून त्यांनी कामे केली. त्यानंतर ये जो है जिंदगी या टीव्ही सीरिअलद्वारे त्यांनी छोट्या पडद्यावर एन्ट्री केली आणि पदार्पणातच ते लोकप्रिय झाले. या सीरिअलमुळे त्यांना केवळ पैसा आणि प्रसिद्धी मिळाली नाही तर त्यांच्या आयुष्याला एक टर्निंग पॉइंट मिळाला. कॉमिक रोलमधील टायमिंगमुळे ते अधिकच लोकप्रिय ठरले.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.