AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजेश खन्ना यांना घेतलेलं दत्तक…, इतकं मोठं सत्य समोर येताच कोलमडलेले काका, अनेक वर्षांनंतर कोणी केला खुलासा?

दिवंगत अभिनेते राजेश खन्ना कायम त्यांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिले. पण राजेश खन्ना यांना दत्तक घेतलं होतं, हे सत्य आजपर्यंत कधीच समोर आलं नाही. अनेक वर्षांनंतर काका यांच्या खासगी आयुष्यातील मोठं सत्य समोर आलंय...

राजेश खन्ना यांना घेतलेलं दत्तक..., इतकं मोठं सत्य समोर येताच कोलमडलेले काका, अनेक वर्षांनंतर कोणी केला खुलासा?
अभिनेते राजेश खन्ना
| Updated on: Jul 27, 2026 | 9:11 AM
Share

झगमगत्या विश्वातील चमकधमक प्रत्येकाला आवडते. पण पडद्यामागचं आयुष्य कसं आहे, सेलिब्रिटी कशाप्रकारे कठीण परिस्थितींचा समाना करतात याबद्दल फार काही समोर येत नाही. दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत देखील असंच काही झालं आहे. राजेश खन्ना बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर चढले. बॉक्स ऑफिस आणि चाहत्यांच्या मनावर त्यांनी राज्य केलं. पण खासगी आयुष्यात त्यांनी असंख्य चढ – उतार पाहिले आहे. राजेश खन्ना यांच्या आयुष्यात मोठं वादळ तेव्हा आलं, जेव्हा त्यांना कळलं की, ते दत्तक आहेत. राजेश खन्ना यांना दत्तक घेतलं होतं.. याबद्दल फार कोणाला माहिती देखील नसेल. पण जेव्हा इतकं मोठं सत्य समोर आलं तेव्हा स्वतः राजेश खन्ना यांना देखील फार मोठा धक्का बसलेला. सांगायचं झालं तर, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, राजेश खन्ना यांच्याबद्दल कथित गर्लफ्रेंड अनीता आडवाणी यांनी मोठा खुलासा केला आहे.

राजेश खन्ना यांची झालेली अनेकदा फसवणूक

नुकतात झालेल्या एका मुलाखतीत अनीता म्हणाल्या, ‘राजेश खन्ना यांनी कधीच कोणावर विश्वास ठेवला नाही. त्यांना दत्तक घेतलं होतं आणि नात्यामध्ये त्यांची अनेकदा फसवणूक झाली. फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी अनेक लोकांची मदत केली आणि अनेकांचं करियर उभं केलं. पण जेव्हा त्यांच्यावर वाईट वेळ आली, तेव्हा त्यांची साथ कोणीच दिली नाही. याच कारणामुळे ते सर्वांना संशयाच्या नजरेनेच पाहायचे. ते राजकीय प्रचारासाठी देखील जायचे. पण त्यांना कोणीच पैसे दिले नाही आणि त्यांनी कोणाकडून पैसे घेतले देखील नाहीत.’

राजेश खन्ना यांना दत्तक घेतलेलं…

अनीता पुढे म्हणाल्या, ‘अनेकांनी त्यांच्या बदलत्या स्वभावाबद्दल विचारलं. पण त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे. जेव्हा त्यांना कळलं की, त्यांना दत्तक घेतलं आहे. ते पूर्णपणे कोलमडले… राजेश खन्ना यांचे त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि बहिणीसोबत चांगले संबंध नव्हते… एकदा बहीण त्यांना भेटण्यासाठी आलेली, तेव्हा त्यांनी विचारलं, ‘ही कोण आहे?”

राजेश खन्ना यांचे हिट सिनेमे…

राजेश खन्ना यांच्या फिल्मी करियरबद्दल सांगायचं झालं तर, 1969 मध्ये ‘आराधना’ सिनेमातून त्यांच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली. त्यांनी सलग 15 हिट सिनेमे बॉलिवूडला दिले. निर्मात्यांची रांग त्यांच्या घराबाहेर लागलेली असायची. पण महानायक अमिताभ बच्चन यांच्या ”एंग्री यंग मॅन’ सिनेमानंतर राजेश खन्ना यांची लोकप्रियता कमी झाली आणि रोमँटिक काळ मागे राहिला. त्यानंतर राजेश खन्ना यांचे सात सिनेमे फ्लॉप ठरले. याचा मोठा धक्का राजेश खन्ना यांना बसला.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल