भारतातील श्रीमंत गायिकांमध्ये आशा भोसले यांचा समावेश, जाणून घ्या संपत्ती
बॉलिवूडच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

Asha Bhosle : बॉलिवूडमधील दिग्गज गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 92 व्या वर्षी घेताल अखेरचा श्वास. शनिवारी त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. ही बातमी समोर येताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं.
आशा भोसले यांच्या नात जनाई भोसले हिने आपल्या X (ट्विटर) अकाउंटवर त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. तिने सांगितलं की, “अतिशय थकवा आणि छातीतील संसर्ग” यामुळे आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. मात्र, आज आशा ताई भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला.
कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्य
8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रात जन्मलेल्या आशा भोसले या लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहिणी आहेत. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे अभिनेते व गायक होते तर आई शिवार्ताई मंगेशकर गृहिणी होत्या. आशा भोसले यांनी दोन विवाह केले होते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले. त्यांची मुलगी वर्षा (पत्रकार) हिने आत्महत्या केली होती तर मुलगा हेमंत भोसले यांचं कर्करोगामुळे निधन झालं. त्यांचा दुसरा मुलगा आनंद भोसले आहे. त्यांची नात जनाई भोसले ही देखील गायिका आहे.
आशा भोसले यांनी 1943 मध्ये मराठी गाण्यांपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हिंदीसह विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली. त्यांच्या गाण्यांनी अनेक दशकं संगीतप्रेमींवर अधिराज्य गाजवलं आहे.
संपत्ती आणि यशाची उंची
मीडिया रिपोर्टनुसार, आशा भोसले यांची एकूण संपत्ती सुमारे 80 ते 100 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. त्यांनी आपल्या प्रतिभा, मेहनत आणि संगीताच्या जोरावर ही संपत्ती उभी केली आहे. त्यांच्या नावावर 12000 हून अधिक गाणी, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आणि रॉयल्टी उत्पन्न आहे.
आशा भोसले यांच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. अनेक नेते आणि बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
