
Bollywood Top Veteran Actress: झगमगत्या विश्वाचं आकर्षण प्रत्येकाला असतं. सिनेविश्वातून मिळणारी प्रसिद्धी, लोकप्रियता आणि संपत्ती… आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे… पण या झगमगत्या विश्वाची एक चांगली बाजू आहे तशीच वाईट बाजू देखील आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणं प्रचंड कठीण आहे. विशेषतः अभिनेत्रींसाठी… बॉलिवूडमध्ये काम करत असताना कधी कौतुक होतं, तर कधी टीकेचा देखील सामना करावा लागतो… आज अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊ जी प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचली, पण खासगी आयुष्यात अभिनेत्रीला चढ – उतारांचा सामना करावा लागला.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, तिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अनेकदा वादग्रस्त परिस्थितीत देखील अडकली… बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना अभिनेत्रीला अनेक जण हडळ देखील म्हणाले. एवढंच नाही तर, अनेकांसोबत अभिनेत्रीचं नाव देखील जोडण्यात आलं.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नाही तर, भानुरेखा गणेशन म्हणजेच बॉलिवूडच्या एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा आहेत. रेखा यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण त्यांचं आयुष्य सोपं नव्हतं. पण त्यांनी कधीच माघार घेतली नाही.
अनेक सेलिब्रिटींसोबत प्रेमसंबंध, लग्नाच्या 6 महिन्यांनंतर पतीने स्वतःचं आयुष्य संपवलं… अनेकांनी टीका केली… अशा असंख्य कठीण संकटांनी रेखा यांनी तोंड दिलं आहे. अभिनेता अक्षय कुमार याच्यापासून अभिनेता संजय दत्त याच्यासोबत देखील रेखा यांच्या नावाची चर्चा रंगली. एवढंच नाही तर, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबत देखील रेखा यांचे प्रेमसंबंध होते. खुद्दा इमरान खान यांनी नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे…
वयाच्या 36 व्या वर्षी रेखा विधवा झाल्या. पण आजही त्या सिंदूर लावतात. अशात रेखा कोणाच्या नावाचं सिंदूर लावतात.. असा प्रश्न अनेकांनी विचारला. यावर रेखा यांनी उत्तर देखील दिलेलं, माझ्या मेकअप आणि साडीवर सिंदूर चांगला दिसतो म्हणून मी सिंदूर लावते… असं रेखा म्हणाल्या होत्या.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील रेखा यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगल्या. अनेक सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र काम देखील केलं आहे. रेखा यांनी अनेकदा बिग बींवर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. पण अमिताभ बच्चन यांनी कधीच रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर कबुली दिली नाही.