200 कोटींचं मनी लाँड्रिंग प्रकरण, दुसऱ्यांदा समन्स बजावूनही जॅकलिन फर्नांडिस ईडीसमोर गैरहजर!

सुकेश चंद्रशेखर मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय वेगाने कारवाई करत आहे. या प्रकरणात, ईडी त्या सर्व लोकांवर बारीक नजर ठेवून आहे, जे 200 कोटींच्या फसवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारे सहभागी आहेत.

200 कोटींचं मनी लाँड्रिंग प्रकरण, दुसऱ्यांदा समन्स बजावूनही जॅकलिन फर्नांडिस ईडीसमोर गैरहजर!
Jacqueline Fernandez
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 3:21 PM

मुंबई : सुकेश चंद्रशेखर मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय वेगाने कारवाई करत आहे. या प्रकरणात, ईडी त्या सर्व लोकांवर बारीक नजर ठेवून आहे, जे 200 कोटींच्या फसवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारे सहभागी आहेत. 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात ईडीने अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) आणि जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) यांना या प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते.

या प्रकरणात नोरा गुरुवारी ईडीसमोर हजर झाली आणि आज, 15 ऑक्टोबर रोजी जॅकलीन ईडीसमोर हजर होणार होती. पण जॅकलिनने आज तिच्याकडे काही महत्त्वाचे काम आहे असे सांगून, ईडीसमोर हजर राहण्यास नकार दिला आहे.

वैयक्तिक कारण देत गैरहजर

वास्तविक, ईडीने जॅकलिन फर्नांडिसला हजर होण्यासाठी 15 ऑक्टोबरची वेळ दिली होती. पण जॅकलिन शेवटच्या क्षणी तिच्या काही महत्त्वाच्या कामाची माहिती देऊन ईडी कार्यालयात पोहोचली नाही. जॅकलिनने ईडी अधिकाऱ्यांना सांगितले की, काही वैयक्तिक परिस्थितीमुळे ती आज हजर राहू शकणार नाही.

असे सांगितले जात आहे की, सुकेशने जॅकलिनला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला होता. या कारणास्तव, ईडीच्या अधिकाऱ्यांना जॅकलिनच्या चौकशीत तिच्या आणि सुकेशमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवहार झाला आहे का, हे शोधायचे आहे. मात्र, यापूर्वी जॅकलिनचीही ईडीने चौकशी केली होती. त्यांचे वक्तव्य मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींखाली नोंदवले गेले. जॅकलिन म्हणाली होती की, ती सुकेशच्या जाळ्यात अडकली होती. सुकेश जॅकलिनला त्याची ओळख बदलून फोन करायचा, अशी बातमी होती.

नोराची चौकशी 8 तास चालली

नोरा फतेही गुरुवारी ईडीच्या कार्यालयात पोहोचली. या दरम्यान 200 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी नोरा फतेहीची सुमारे आठ तास चौकशी केली. नोरा फतेही सकाळी 11.30 वाजता ईडीच्या दिल्ली कार्यालयासमोर हजर झाली आणि रात्री 8.30 पर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली.

 जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय आहे?

हे प्रकरण 200 कोटींच्या खंडणीचे आहे, त्यातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर आहे. सुकेश चंद्रशेखरने एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून एवढी मोठी रक्कम वसूल केली होती. यामुळे तो तुरुंगात आहे. या प्रकरणात सुकेशची पत्नी लीना पॉलही सापडल्याची माहिती समोर आली आहे. या कारणास्तव लीना पॉलचीही तासन्तास चौकशी करण्यात आली. पोलिसांकडून सांगण्यात आले की, पॉलने फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी आदितीची फसवणूक करण्यासाठी सुकेशला कथितपणे मदत केली होती. या प्रकरणात आतापर्यंत सुकेश आणि त्याच्या पत्नीशिवाय चार जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Kajol : लाख मोलाची बनारसी साडी परिधान करत काजोलची दुर्गा पूजेला हजेरी, शेअर केले फोटो

Bigg Boss 15 | ‘बिग बॉस 15’च्या घरात लीपलॉक सीन, मायशा-ईशानची लव्हस्टोरीने ओलांडल्या मर्यादा!

Gadar 2 | सनी देओल जुन्याच कलाकारांसोबत आपली प्रेमकथा पुढे नेणार, जाणून घ्या ‘गदर 2’ कधी होणार रिलीज?