AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

67th National Film Awards : ‘थलायवा’ रजनीकांत यांचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मान होणार, दिल्लीत पार पडणार पुरस्कार सोहळा!

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात येत आहे. या पुरस्कारासाठी रजनीकांत यांचे नाव एप्रिलमध्येच जाहीर करण्यात आले होते.

67th National Film Awards : ‘थलायवा’ रजनीकांत यांचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मान होणार, दिल्लीत पार पडणार पुरस्कार सोहळा!
Rajinikanth
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 11:35 AM
Share

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात येत आहे. या पुरस्कारासाठी रजनीकांत यांचे नाव एप्रिलमध्येच जाहीर करण्यात आले होते. आता चित्रपट महोत्सव भारत संचालनालयाने सोशल मीडियावर माहिती दिली आहे की, 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार 25 ऑक्टोबर रोजी ‘थलायवा’ रजनीकांत यांना देण्यात येत आहे.

स्वत: रजनीकांत यांनीही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दिवसाबद्दल सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. यासोबतच त्यांनी मुलगी सौंदर्या विषगनचे यशही शेअर केले. तथापि, त्यांना हे देखील दुःख आहे की, त्यांचे मार्गदर्शक केबी (के बालाचंदर) त्यांना पुरस्कार प्राप्त करताना पाहण्यासाठी हयात नाहीत.

अभिनेते आणि अभिमानी वडील!

रजनीकांत यांनी तमिळ आणि इंग्रजी भाषेत एक पोस्ट शेअर केले की, 25 ऑक्टोबर हा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा का आहे? त्यांनी लिहिले की, “उद्या माझ्यासाठी दोन खास टप्पे असणारा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. लोकांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे भारत सरकारकडून मला पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.”

“दुसरे म्हणजे, माझी मुलगी सौंदर्या विशगन हिने स्वतःच्या प्रयत्नांनी “हूट” अॅप बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे आणि ती ते जगासमोर सादर करणार आहे. लोक आता त्यांचे विचार त्यांच्या आवाजाद्वारे व्यक्त करू शकतात, जसे ते त्यांच्या आवडीच्या कोणत्याही भाषेत लिहितात इच्छा आणि विचार करतात. माझ्या आवाजात हे नाविन्यपूर्ण, उपयुक्त आणि अशा प्रकारचे पहिले “Hot App” लाँच करताना मला खूप आनंद होत आहे.”

पाहा पोस्ट :

रजनीकांत यांनी 1975 मध्ये ‘अपूर्व रागंगल’ या तामिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘बिल्लू’, ‘मुथू’, ‘बाशा’, ‘शिवाजी’ आणि ‘अंथिरन’, ‘हम’, ‘अंधा कानून’, ‘भगवान दादा’, ‘टेरर हाय टेरर’ आणि ‘चालबाज’ यांसारख्या अनेक बॉलिवूड सिनेमांमध्येही ते दिसले आहेत. त्यांनी सगळ्याच चित्रपटातून अभिनयाची प्रतिभा दाखवली. नुकताच 4 नोव्हेंबरला म्हणजेच दिवाळीला रजनीकांत यांचा ‘अन्नाथे’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

गेल्या एप्रिलमध्ये रजनीकांत यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देण्याची घोषणा करण्यात आली होती. रजनीकांत यांना भारत सरकारने 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2016 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित केले आहे. विशेष म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे ‘दादासाहेब फाळके’ यांच्या नावाने 1969 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती. हा भारतीय चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.

हेही वाचा :

Death Anniversary | जसपाल भट्टींच्या ‘फ्लॉप शो’ने राजकारणी हादरले, अवघ्या 10 भागांनंतर गुंडाळली मालिका!

Amana Sharif : करवा चौथच्या निमित्ताने आमना शरीफने पारंपारिक अवतारात जिंकली चाहत्यांची मने, फोटो पाहून चाहते घायाळ

Ashram 3 | ‘आश्रम 3’ वेब सीरीजच्या सेटवर बजरंग दलाचा हल्ला, प्रकाश झा यांच्या चेहऱ्यावर फेकली शाई!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.