AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan Marriage : घराला लायटिंग, बसायला खुर्च्या, आमिर खानच्या तिसऱ्या लग्नात तामझाम काय? पहिला व्हिडीओ समोर; नवरी…

या विवाह सोहळ्यात नेमके कोण-कोण हजेरी लावणार हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर, दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे या लग्नाला हजर राहण्याची शक्यता आहे.

Aamir Khan Marriage : घराला लायटिंग, बसायला खुर्च्या, आमिर खानच्या तिसऱ्या लग्नात तामझाम काय? पहिला व्हिडीओ समोर; नवरी...
aamir khan and gauri spratt marriageImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 04, 2026 | 5:32 PM
Share

Aamir Khan Marriage : प्रसिद्ध अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करतोय. येत्या 5 जुलै रोजी आमिर खानच्या घरीच हा विवाह सोहळा पार पडणार आहे. आमिर खानने स्वत:च याबात माहिती दिली आहे. आमिर खान आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट बऱ्याच दिवसांपासून एकमेकांच्या रिलेशनमध्ये होते. हे दोघे अनेकदा एकत्र दिसलेले आहेत. गुरुवारी मुंबईत प्रीतम अँड पेड्रो चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान आमिर खानने मी लग्न करत असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आता या विवाहसोहळ्याची जोमात तयारी केली जात आहे. विवाहासाठी लागणारे सामान आमिर खानच्या घरी आणले जात आहे. याचे काही व्हिडीओ सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

आमिर खानचे लग्न कुठे होणार?

मुंबईतील पाली हिल येथे आमिर खानचा एक फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्येच आमीर खानचा विवाह सोहळा पार पडणार आहे. विशेष विवाह कायद्यानुसार हा विवाह होईल. या विवाहासाठी आमिर खानचे घर सजवले जात आहे. त्याच्या घरावर रोषणाई केलेली दिसत आहे. दुसरीकडे खुर्च्या आणि इतर सामानही बाहेरून आणले जात आहे.

बहीण पोहोचली, 150 पाहुणे येणार

सध्या मुंबईत तुफान पाऊस चालू आहे. गरज असेल तरच बाहेर पडा असा इशारा देण्यात आलेला आहे. दुसरीकडे आमिर खान स्वत:च्याच घरी घरी अगदी साध्या पद्धतीने विवाहबद्ध होत आहे. वरुणराजादखील या जोडीला आशीर्वाद देत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या विवाहात सहभागी होण्यासाठी आमिर खानची बहीण त्याच्या घरी पोहोचली आहे. या सोहळ्याला मोजकेच 100 ते 150 पाहुणे बोलावले जाणार आहेत. खूपच जवळच्या लोकांना, मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना आमिरने आमंत्रित केले आहे.

विवाहाला कोण कोण हजर राहणार?

या विवाह सोहळ्यात नेमके कोण-कोण हजेरी लावणार हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर, दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे या लग्नाला हजर राहण्याची शक्यता आहे. आमिर आणि गौरीचा विवाह सोहळा नेमका कसा असेल? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा