अभिनेता संदीप नाहर आत्महत्येप्रकरणात मोठा ट्विस्ट, सासूविरोधात तक्रार दाखल

अभिनेता संदीप नाहर (Sandeep Nahar) याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आयुष्य संपवलं.

  • गोविंद ठाकूर,टीव्ही 9 मराठी,मुंबई
  • Published On - 17:04 PM, 17 Feb 2021
अभिनेता संदीप नाहर आत्महत्येप्रकरणात मोठा ट्विस्ट, सासूविरोधात तक्रार दाखल

मुंबई : अभिनेता संदीप नाहर (Sandeep Nahar) याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आयुष्य संपवलं. मात्र, आता या सर्व प्रकरणात रोज वेगवेगळे ट्विस्टसमोर येत आहेत. संदीप नाहर आत्महत्येप्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे, काल रात्री गोरेगाव पोलिसांनी संदीप नाहर आत्महत्या प्रकरणात संदीप नाहरची पत्नी आणि सासूविरोधात तक्रार दाखल करून आयपीसीच्या कलम 306,34 अन्वयेप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. (Actor Sandeep Nahar’s family has lodged a complaint against his wife and mother-in-law in a suicide case)

संदीप नाहरने फेसबुकवर एक सुसाइड नोट शेअर केली आणि आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. त्यामध्ये त्याने त्याच्या पत्नीचा आणि सासूचा उल्लेख केला होता. ही तक्रार संदीप नाहरच्या कुटुंबियांनी दिली आहे, त्यानुसार गोरेगाव पोलीस आता 306, 34 अन्वये तक्रार नोंदवून अधिक तपास करत आहेत. संदीप नाहरने आत्महत्या केली तेव्हा पत्नी कांचन शर्माने सुतारांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडला.

त्यानंतर तिने संदीप नाहरला घराजवळच्या रुग्णालयात नेले होते. पण तेथील रुग्णालयाने संदीपला दाखल करून घेण्यास नकार दिला होता. जेव्हा ती दुसर्‍या रुग्णालयात पोहोचली तेव्हा डॉक्टरांनी संदीपला मृत घोषित केले. या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांनी संशय व्यक्त केला होता.
रोज सकाळ संध्याकाळ भांडणं. आता माझ्यात ऐकण्याची ताकद नाही.

त्यात कांचनची काही चूक नाही. तिचा स्वभावच तसा आहे. तिला सर्वकाही नॉर्मल वाटतं, पण माझ्यासाठी हे सगळं नॉर्मल नाही. मी मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मी खूप वाईट वेळ पाहिली पण कधी अडलो नाही. डबिंग केलं. जिम ट्रेनर झालो. वन रुम किचनमध्ये आम्ही 6 जण राहत होतो. स्ट्रगल होतं पण समाधान होतं. आज मी खूप काही मिळवलं आहे.

पण लग्नानंतर समाधान नाही. 2 वर्षात खूप काही बदललं आहे. ही गोष्टी मी कुणासोबत शेअर करु शकत नाही. जगाला वाटतं की सर्वकाही ठीक सुरु आहे. कारण ते फक्त आमच्या सोशल मीडिया पोस्ट किंवा स्टोरी पाहतात. जे सगळं खोटं आहे. जगाला चांगली प्रतिमा दाखवण्यासाठी हे टाकतो. पण हे सगळं खोटं आहे”, असंही संदीपने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

संबंधित बातम्या : 

अक्षय कुमारसोबत ‘केसरी’मध्ये काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या, मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

‘धाकड’मध्ये बदलला कंगनाचा अवतार, फोटो पाहून चाहतेही घाबरले!

(Actor Sandeep Nahar’s family has lodged a complaint against his wife and mother-in-law in a suicide case)