Samantha Ruth Prabhu : बाळाविषयी माझ्या मनात काही खास प्लॅन्स आहेत- समंथा

Samantha Ruth Prabhu : बाळाविषयी माझ्या मनात काही खास प्लॅन्स आहेत- समंथा
समंथा रुथ प्रभू
Image Credit source: समंथा रुथ प्रभू इन्स्टाग्राम

समंथाने बाळाबद्दल तिचं मत सांगितलं आहे. तिला एका मुलाखतीत तिला अपत्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा "माझ्या मनात बाळाबद्दल काही गोष्टी ठरलेल्या आहेत", असं समंथा म्हणाली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Mar 30, 2022 | 9:11 PM

मुंबई : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) ही टॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोडी आहे. या दोघांचं लग्न जितकं चर्चेत होतं, त्याहून अधिक त्यांच्या घटस्फोटाची चर्चा झाली. लग्नाच्या अवघ्या चार वर्षांतच ही जोडी विभक्त झाली. या दोघांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. घटस्फोटानंतर समंथा अनेकदा सोशल मीडियावर व्यक्त झाली. यावेळी तिने ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड उत्तर दिलं. आता समंथाने बाळाबद्दल तिचं मत सांगितलं आहे. तिला एका मुलाखतीत तिला अपत्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा “माझ्या मनात बाळाबद्दल काही गोष्टी ठरलेल्या आहेत”, असं समंथा म्हणाली आहे.

काय म्हणाली समंथा?

एका मुलाखती दरम्यान समंथाला अपत्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ती यावर बोलती झाली. “हे खरं आहे आताच माझा घटस्फोट झालाय. पण माझ्या मनात बाळाबद्दल काही गोष्टी ठरलेल्या आहेत. वैयक्तिक कारणांमुळे माझा प्लॅन लांबणीवर पडला आहे. पण मी बाळाला जन्म देण्यासाठी उत्सुक आहे”, असं समंथा म्हणाली आहे.

समंथाने लग्नातली साडी नागा चैतन्यला परत केल्याचीही बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. समंथाने लग्नात नागा चैतन्यची आजी डी. राजेश्वरी यांची साडी परिधान केली होती.हीच साडी तिने आता नागा चैतन्यला परत केल्याचं कळतंय. 2 ऑक्टोबर 2021 रोजी समंथा आणि नागा चैतन्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर समंथाने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून अक्किनेनी हे आडनावसुद्धा काढून टाकलं. नागा चैतन्य अनफॉलोही केलं आहे.

समंथा आणि नागा चैतन्य यांचं नातं

6 ऑक्टोबर 2017 रोजी समंथा आणि नागा चैतन्यने लग्नगाठ बांधली. या दोघांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशीच आहे. दोघं जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना भेटले, तेव्हा दोघंही दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. 2009 मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समंथा-नागा चैतन्यची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यावेळी समंथा ही अभिनेता सिद्धार्थला तर नागा चैतन्य हा श्रुती हासनला डेट करत होता. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समंथा-नागा चैतन्यमध्ये चांगली मैत्री झाली. 2015 मध्ये जेव्हा दुसऱ्या चित्रपटानिमित्त दोघं पुन्हा भेटले, तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2017 मध्ये गोव्यात दोघांनी लग्नगाठ बांधली. आता दोघे विभक्त झाले आहेत.

संबंधित बातम्या

Rahul Vaidya Disha Parmar Photos : राहुल वैद्य आणि दिशा परमार यांचा पार्टी लुक, पाहा फोटो…

Nusrat Jahan Photos : “मी फुलासारखी नाही तर बॉम्बसारखी नाजूक!”, तृणमूल खासदार नुसरत जहाँ यांची पोस्ट चर्चेत

अमृता खानविलकर, तू माझ्यासाठी स्टार नाहीस…- अंकिता लोखंडे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें