अमृता खानविलकर, तू माझ्यासाठी स्टार नाहीस…- अंकिता लोखंडे

अमृता खानविलकर, तू माझ्यासाठी स्टार नाहीस...- अंकिता लोखंडे
अंकिता लोखंडे,अमृता खानविलकर
Image Credit source: अंकिता लोखंडे,अमृता खानविलकर इन्स्टाग्राम

अमृता खानविलकर हिचा चंद्रमुखी नावाचा सिनेमा येतोय. या सिनेमाचं चंद्रा हे गाणं सध्या रिलीज झालंय. याचंच पोस्टर अंकिता लोखंडेने शेअर केलंय. या पोस्टरला तिने जे कॅप्शन दिलंय ते अनेकांचं लक्ष वेधून घेतंय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Mar 30, 2022 | 5:57 PM

मुंबई : अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही सध्या चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. तिच्या कामापासून, तिचं पर्सनल आयुष्य, त्यातील घडामोडी यासह ती सोशल पोस्टमुळे ही चर्चेत असते. आताही तिची अशीच एक पोस्ट चर्चेत आली आहे. ही पोस्ट आहे अभिनेत्री अमृता खानविलकरबाबतची (Amruta Khanvilkar). अमृता खानविलकर हिचा चंद्रमुखी नावाचा सिनेमा येतोय. या सिनेमाचं चंद्रा हे गाणं सध्या रिलीज झालंय. याचंच पोस्टर अंकिताने शेअर केलंय. या पोस्टरला तिने जे कॅप्शन दिलंय ते अनेकांचं लक्ष वेधून घेतंय. “अमृता खानविलकर, तू माझ्यासाठी स्टार नाहीस”,असं अंकिता लोखंडे या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हणाली आहे. शिवाय पुढे तिने अमृताच्या कामाविषयीही भाष्य केलंय.

अंकिता लोखंडेची इन्स्टाग्राम पोस्ट अंकिता लोखंडेची एक इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आहे. यात तिने अमृता खानविलकरच्या कामाबाबत भाष्य केलंय. “अमृता खानविलकर तू माझ्यासाठी स्टार नाहीस तर सेलिब्रिटी आहेस. खरी कलाकार आहेस”, असं अंकिता म्हणाली आहे. “तू माझ्यासाठी एक अशी कलाकार आहेस जी आपल्या अभिनयाच्या जोरावर आम्हाला हसवू आणि रडवूही शकते. मला अजूनही चांगलं आठवतंय की जेव्हा आपण ‘झी सिनेस्टार की खोज’ या कार्यक्रमात एकत्र होतो, तेव्हा तुझ्या आणि माझ्यामध्ये नेहमीच कोण चांगला नाचतो याची एक स्पर्धा असायची. पण तुलाही माहिती आहे की मी नेहमीच एक सर्वोत्कृष्ट डान्सर आहे. बरोबर ना अम्मू? हा झाला विनोदाचा भाग. पण काही दिवसांपूर्वी जेव्हा मी तुझ्या सिनेमाचं पोस्टर लाँच झालं. ते पाहिलं त्यावेळी माझ्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले. तुला तिथे पाहणं हे एखाद्या स्वप्नासारखं होतं आणि त्यांनी ज्या प्रकारे ते लाँच केले ते पाहून फक्त वाव इतकं वाटलं!”, असंही अंकिताने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

“तुला आणि चंद्रमुखीच्या संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा…. तुला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी मी आतुर आहे. देव सदैव तुझ्या पाठिशी राहू देत… तू जशी आहेस तशीच राहा. खूप सारं प्रेम. 2004 पासून सुरू झालेली आपली मैत्री मरेपर्यंत कायम राहिलं”, असं अंकिता म्हणाली आहे.

‘चंद्रमुखी’ या सिनेमाचं टिझर काही दिवसांआधी प्रदर्शित झालं होतं. त्यावेळी ही पाठमोरी बसून शृंगार करणारी ‘चंद्रमुखी’ दिसत होती. तर पिळदार शरीरयष्टी असलेला करारी दौलत देशमाने ही पाठमोरा दिसत होता.काही दिवसांआधी दौलत देशमानेचा चेहरा आपल्या समोर आला. ही भूमिका आदिनाथ कोठारे करतोय.आता ‘चंद्रा’ही प्रेक्षकांसमोर आली आहे. चंद्राची भूमिका अमृता खानविलकर करत आहे. हा सिनेमा म्हणजे राजकारणात मुरलेला दौलत देशमाने आणि लावणी कलावंत यांच्या अनोख्या प्रेमाची ही कहाणी आहे. हा सिनेमा 29 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

Alia Bhatt: “त्यांना भीती होती की मी कदाचित लग्नच करणार नाही”; आलिया भट्टचा VIDEO चर्चेत

जॅकी श्रॉफ यांच्या मनाची श्रीमंती; निधनाचं वृत्त समजताच घरगड्याच्या घरी सांत्वनाला पोहोचले

Video: “त्यांना अद्दल घडवणं खूप महत्त्वाचं”; ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेत्रीची फसवणुकीबाबतची पोस्ट चर्चेत

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें