Video: “त्यांना अद्दल घडवणं खूप महत्त्वाचं”; ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेत्रीची फसवणुकीबाबतची पोस्ट चर्चेत

चित्रपट, मालिका किंवा वेब सीरिजमध्ये काम देतो असं सांगून फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारी समोर येत असतात. अशीच घटना ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) या लोकप्रिय मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीसोबत घडली होती.

Video: त्यांना अद्दल घडवणं खूप महत्त्वाचं; 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील अभिनेत्रीची फसवणुकीबाबतची पोस्ट चर्चेत
Majhi Tujhi ReshimgathImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 11:12 AM

चित्रपट, मालिका किंवा वेब सीरिजमध्ये काम देतो असं सांगून फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारी समोर येत असतात. अशीच घटना ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) या लोकप्रिय मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीसोबत घडली होती. अभिनेत्री धनश्री भालेकरला (Dhanashri Bhalekar) वेब सीरिजमध्ये काम देतो असं सांगून त्यांच्याकडून 22 हजार 368 रुपये उकळण्यात आले होते. याप्रकरणी धनश्रीने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि त्यानंतर दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. धनश्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून याबद्दलची माहिती सर्वांना दिली होती. धनश्रीने आता पुन्हा एक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. फसवणूक झालेल्या प्रकरणातील आपले सर्व पैसे परत मिळाल्याची माहिती धनश्रीने या व्हिडीओतून दिली आहे. त्याचसोबत तिने चाहत्यांना एक आवाहनसुद्धा केलं आहे. (Marathi Actress)

काय म्हणाली धनश्री?

“याच्याआधी एका व्हिडीओमध्ये मी माझ्यासोबत झालेल्या फसवणुकीबद्दल सांगितलं होतं. मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय, की फसवणुकीत गेलेले माझे सगळे पैसे मला परत मिळाले आहेत. यासाठी मी पोलिसांचे आभार मानते. त्यांनी तपास करून माझे पैसे परत मिळवून देण्यासाठी मदत केली. तुम्हा सर्वांचेही खूप आभार, कारण तुम्हीसुद्धा माझी खूप साथ दिली. यानिमित्ताने मला तुम्हाला सांगायचं आहे की जर कोणी तुमची फसवणूक करत असेल तर त्याविरोधात आवाज उठवा. आपणच पहिलं पाऊल उचललं नाही तर हे शक्य होत नाही. समाजात असे बरेच लोक आहेत, जे आपली मदत करतील. त्यामुळे कृपया तुमच्यासोबत अशी कोणती फसवणूक झाली असेल किंवा होत असेल तर त्याविरोधात तक्रार दाखल करा. आणि सर्वांत आधी हे होऊ नये यासाठी काळजी घ्या. आपण जर तक्रार केली नाही तर फसवणूक करणाऱ्यांचंही तितकंच फावतं. त्यामुळे त्यांना अद्दल घडवणं महत्त्वाचं आहे. आपल्याला असंच वाटतं की एकदा फसवणूक झाली की पैसे परत मिळत नाही, पण असं नसतं. हे पैसे परत मिळू शकतात, पण त्यासाठी तुम्ही पहिलं पाऊल उचलणं गरजेचं आहे,” असा संदेश तिने नेटकऱ्यांना दिला आहे.

नेमकं काय घडलं होतं?

8 डिसेंबर 2021 रोजी धनश्रीला नामांकित निर्मिती कंपनीच्या नावाने एक ई-मेल आला. मेल पाठविणाऱ्या व्यक्तीने आपलं नाव अनिकेत असल्याचं सांगत तो दिग्दर्शक म्हणून काम करत असल्याचं भासवलं. एका वेब सीरिजमध्ये धनश्रीची निवड झाल्याचं त्या मेलमध्ये सांगण्यात आलं होतं. नामांकित कंपनी असल्याने धनश्रीनेही काम करण्यास होकार दिला. त्यानंतर अनिकेतने व्हॉट्सअॅपवर संपर्क साधून पुढील प्रक्रियेसाठी कार्यालयात बोलविण्यात येईल असं सांगितलं. काही दिवसांनी अनिकेतने कोरोनाचं कारण देत शूटिंगच्या तारखा पुढे ढकलल्याचं धनश्रीला कळवलं. तसंच काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी हैदराबादमधील कार्यालयात जावं लागेल, असंदेखील सांगितलं. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी शीव नावाच्या एका व्यक्तीने धनश्रीला संपर्क केला. कंपनीचा कार्यकारी निर्माता असल्याचं त्याने सांगितलं. हैदराबादला कंपनीच्या कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी या, असं त्याने धनश्रीला सांगितलं. धनश्रीकडून विमानाच्या तिकिटाची नोंद होत नव्हती, म्हणून शीवने तिला एक क्रमांक दिला आणि त्या क्रमांकावर पैसे भरण्यास सांगितले. धनश्रीने विमान तिकिटाचे 22 हजार 368 रुपये त्या खात्यात जमा केले. मात्र त्यानंतर तिला तिकिट मिळालंच नाही. घडलेल्या घटनेनंतर धनश्रीने अनेकदा शीव आणि अनिकेत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांकडून कोणतंच उत्तर आलं नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तिने कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हेही वाचा:

जॅकी श्रॉफ यांच्या मनाची श्रीमंती; निधनाचं वृत्त समजताच घरगड्याच्या घरी सांत्वनाला पोहोचले

“डोकं घरी ठेवून आलात वाटतं”; भर पत्रकार परिषदेत पत्रकारावर चिडला जॉन

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.