Urvashi Rautela : एका क्षणात 70 लाख लंपास, उर्वशी रौतेलासोबत चोरीची धक्कादायक घटना!
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशीर रौतेलाची बॅग चोरीला गेली आहे. तिच्या बॅगेत एकूण 70 लाख रुपयांचे सामान होते, असे बोलले जात आहे.

Urvashi Rautela Bag Stolen : बॉलिवूडची ग्लॅमरस आणि प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच चर्चेत असते. तिने सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोची, व्हिडीओंची नेहमीच चर्चा होते. वेगवेगळ्या विषयांवर केलेल्या विधांनमुळेही ती कधीकधी वादात सापडते. दरम्यान, आता मात्र ही अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तिच्यासोबत चोरीचे मोठे प्रकरण घडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिचे जवळपास 70 लाख किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. या घटनेची देशभरात आता चर्चा होत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार उर्वशी रौतेलाचे साधारण 70 लाख किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. याबाबतची माहिती तिने स्वत:च सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. उर्वशी नुकतेच विंबल्डन टुर्नांमेटसाठी लंडनला गेली होती. ती एमीरेट्स विमान वाहतूक कंपनीच्या विमानातून प्रवास करत होती. हे विमान गॅटविक विमानताळावर उतरले होते. विमान उतरल्यावर तिने आपले सामान घेतले. मात्र तिच्या सामानात क्रिश्चियन डियोर या ब्रँडची महागडी ब्रँडेड बॅग नसल्याचे दिसले. याबाबतची सर्वच माहिती तिने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
मदत करण्याचं केलं आवाहन
तिच्या सोशल मीडियावरील पोस्टनुसार माझ्यावर वारंवार अन्याय होत आहे, असं म्हटलंय. तसेच माझी ब्राऊन कलरची बॅग चोरीला गेली आहे. या बॅगचा फोटो तसेच त्या बॅगवर असलेले स्टिकर माझ्या पोस्टमध्ये दिलेले आहे, अशी माहिती तिने आपल्या या पोस्टमध्ये दिलीय. तसेच कृपया ती बॅग परत मिळवण्यासाठी मदत करा, असं आवाहनही तिने केलंय.
View this post on Instagram
उर्वशीर रौतेलाच्या टीमने काय सांगितलं?
उर्वशीसोबत चोरीची घटना घडल्यानंतर तिच्या टीमनेही अधिकृत भूमिका मांडली आहे. उर्वशी ही प्लॅटिनम एमीरेट्स मेंबर आहे. तसेच ग्लोबल आर्टिस्ट असल्याने उर्वशी विंबल्डन स्पर्धेसाठी लंडनला गेली होती. मात्र गॅटविक विमानतळावर तिची बॅग चोरीला गेली आहे. बॅगवर स्टिकर आणि टॅग असूनही ते चोरीला गेले आहे. या बॅगेचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही. ही घटना म्हणजे विमानतळावरच्या सुरक्षेतील चूक असून हा प्रकार चितांजनक आहे, असं उर्वशीच्या टीमने म्हटलं आहे.
बॅगमध्ये 70 लाखांचं सामान
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार तिच्या या बॅगमध्ये महागडे दागिने, मेकअपचे सामान तसेच काही खासगी वस्तू होत्या. या सर्व वस्तूंची किंमत साधारण 70 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता उर्वशीचे हे सामान परत मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
