AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेशर्म रंग गाण्यावरून देशात वाद सुरू असतानाच जर्मनीमध्ये पठाण चित्रपटाची क्रेझ

या चित्रपटामध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पादुकोण देखील मुख्य भूमिकेत आहे.

बेशर्म रंग गाण्यावरून देशात वाद सुरू असतानाच जर्मनीमध्ये पठाण चित्रपटाची क्रेझ
'पठाण' मोडणार सर्व रेकॉर्ड ? ॲडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी सिनेमाने रचला मोठा विक्रम
| Updated on: Dec 30, 2022 | 9:02 PM
Share

मुंबई : शाहरुख खान हा त्याच्या पठाण या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाचे आतापर्यंत दोन गाणे रिलीज झाले आहेत. बेशर्म रंग या गाण्यामुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या चित्रपटामध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पादुकोण देखील मुख्य भूमिकेत आहे. बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे मोठा वाद सुरू आणि हेच पठाण चित्रपटाच्या वादाचे कारण आहे. बेशर्म रंग गाण्याला लोक मोठा प्रमाणात विरोध करत असतानाच 29 डिसेंबरला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने निर्मात्यांना चित्रपटामध्ये काही बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

पठाण चित्रपटाच्याविरोधात सोशल मीडियावर मोठी मोहीम सुरू असून चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. अनेकांनी या चित्रपटाच्याविरोधात भूमिका घेतली आहे.

पठाण चित्रपटामुळे शाहरुख खान याला जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळत आहेत. अजूनही पठाण चित्रपटाचा ट्रेलर निर्मात्यांनी रिलीज केला नाहीये. शाहरुख खान याचे चाहते या ट्रेलरची वाट पाहात आहेत.

भारतामध्ये पठाण चित्रपटामुळे मोठा वाद सुरू असतानाच जर्मनीमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसत आहे. कारण पठाण चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतर काही तासांमध्ये सर्व तिकिटे विकली गेली आहेत.

पठाण चित्रपटामुळे वाद निर्माण झाल्याने याचा फायदा हा चित्रपटालाच होताना दिसत आहे. आता भारतामध्ये काय प्रतिसाद या चित्रपटाला मिळतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

पठाण या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान हा तब्बल चार वर्षांनंतर पुनरागमन करत आहे. इतकेच नाहीतर पठाणनंतर लगेचच शाहरुख खान याचा डंकी हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?