नागा चैतन्यशी घटस्फोटानंतर समंथाने सोशल मीडियावर शेअर केला पहिला फोटो, पाहा अभिनेत्रीचा अनोखा अंदाज…

भिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) ही साऊथ इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट जोडी आता विभक्त झाली आहे. अलीकडेच सामंथा यांनी सोशल मीडियावर विभक्त झाल्याची माहिती दिली होती.

नागा चैतन्यशी घटस्फोटानंतर समंथाने सोशल मीडियावर शेअर केला पहिला फोटो, पाहा अभिनेत्रीचा अनोखा अंदाज...
समंथा

मुंबई : अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) ही साऊथ इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट जोडी आता विभक्त झाली आहे. अलीकडेच सामंथा यांनी सोशल मीडियावर विभक्त झाल्याची माहिती दिली होती. नागा आणि समंथाच्या विभक्त झाल्याची बातमी ऐकून चाहते हैराण झाले. आता पतीपासून वेगळे झाल्यानंतर समंथा हिने पहिली पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

समंथाने तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे आणि तिच्या केसांमध्ये फुले आहेत. तिने फोटो शेअर केला आणि सांगितले की 8 ऑक्टोबर रोजी ती लॅकम फॅशन वीकमध्ये दिसणार आहे.

पाहा पोस्ट :

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

चाहत्यांकडून पाठिंबा

समंथाची ही पोस्ट चाहत्यांना खूप आवडत आहे. काही तासांत 8 लाखांहून अधिक लोकांनी तिच्या या पोस्टला लाईक केले आहे. चाहते यावर भरभरून कमेंट करत आहेत आणि सांगत आहेत की, ते समंथासोबत आहेत. एका चाहत्याने टिप्पणी केली की, मजबूत रहा सॅमू. आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. त्याचबरोबर काही चाहते तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत.

सोशल मीडियावर बदलले नाव

नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर समंथा हिने पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिचे नाव बदलले आहे. काही काळापूर्वी तिने तिचे नाव बदलून फक्त ‘एस’ केले पण आता नागापासून विभक्त झाल्यानंतर तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर समंथा रुथ प्रभू हे नाव लिहिले आहे.

सोशल मीडियावर देण्यात आली घटस्फोटाची माहिती

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून, समंथाने तिच्या आणि नागाच्या विभक्ततेबद्दल चाहत्यांना माहिती दिली. तिने लिहिले की, आमच्या सर्व हितचिंतकांनो, खूप विचारविनिमयानंतर, सॅम आणि मी पती-पत्नी म्हणून आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की, आमची मैत्री दहा वर्षांपेक्षा जास्त आहे जी आमच्या नात्याचा आधार होती. जी आमच्यामध्ये नेहमीच एक विशेष नाते ठेवेल. आम्ही आमच्या चाहत्यांना, माध्यमांना आणि हितचिंतकांना विनंती करतो की, या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रायव्हसी द्या. आपल्या सहकार्याबद्दल आपले आभार.

समुपदेशनही निष्फळ

अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा अक्किनेनी यांनाही त्यांचे लग्न वाचवायचे होते, यामुळे त्यांनी समुपदेशन घेण्याचा निर्णय घेतला, पण त्याचाही विशेष फायदा झाला असे वाटत नाही. हे जोडपे त्यांच्या लग्नासंदर्भात माध्यमांमध्ये सुरू असलेल्या कोणत्याही बातमीला कोणतेही उत्तर देत नाही. याचा अर्थ असा की, माध्यमांमध्ये लिहिल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी एक प्रकारे बरोबर आहेत. दोघांच्या कौटुंबिक न्यायालयात समुपदेशन देखील केले गेले आहे, परंतु तरीही या जोडप्याला एकमेकांपासून वेगळे व्हायचे आहे.

हेही वाचा :

KBC 13 | ‘तो’ व्हिडीओ पाहिला अन् बिग बींसमोरच जिनिलियाला कोसळलं रडू, पाहा ‘KBC 13’च्या मंचावर नेमकं काय घडलं…

Sharad Kelkar Net Worth : कधीकाळी करायचा चोर बाजारातून खरेदी, आता कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे शरद केळकर!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI