AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Kelkar Net Worth : कधीकाळी करायचा चोर बाजारातून खरेदी, आता कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे शरद केळकर!

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपली खास ओळख निर्माण केल्यानंतर शरद केळकरने (Sharad Kelkar) बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडली आहे. शरदला त्याच्या अभिनयासाठी कौतुकाची थाप मिळाली आहे. आपल्या अभिनयाने आणि आपल्या आवाजाच्या जादूने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Sharad Kelkar Net Worth : कधीकाळी करायचा चोर बाजारातून खरेदी, आता कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे शरद केळकर!
Sharad Kelkar
| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 11:04 AM
Share

मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपली खास ओळख निर्माण केल्यानंतर शरद केळकरने (Sharad Kelkar) बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडली आहे. शरदला त्याच्या अभिनयासाठी कौतुकाची थाप मिळाली आहे. आपल्या अभिनयाने आणि आपल्या आवाजाच्या जादूने चाहत्यांची मने जिंकली आहेत. इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्षे मेहनत केल्यानंतर शरदने त्याचे हे स्थान मिळवले आहे. तो कोट्यवधींच्या मालमत्तेचा मालक बनला आहे.

शरद केळकर आज आपला 45वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1976 रोजी ग्वाल्हेर येथे झाला. आज शरदच्या वाढदिवशी, आम्ही तुम्हाला त्याच्या नेटवर्थबद्दल सांगणार आहोत.

अभिनेत्याची संपत्ती

अभिनेता शरद केळकर अतिशय आलिशान जीवनशैली जगतात. Marathibio.comच्या अहवालानुसार, शरदची एकूण संपत्ती 5-10 दशलक्ष आहे. त्याचे मुख्य उत्पन्न चित्रपट, मालिकांमध्ये अभिनय आणि जाहिरातीमध्ये काम केल्याने येते. शरद व्हॉईस ओव्हरसाठी देखील चांगली फी घेतो.

दिल्लीच्या चोर बाजारातून करायचा खरेदी

शरद केळकरनेही त्यांच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल माध्यमांना बरेच काही सांगितले आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो दिल्लीतील चोर बाजारातून कपडे विकत घेऊन ते घालायचा. शरद केळकर आपल्या मुलाखतीत म्हणाला होता की, ‘दिल्लीतील चोर बाजार ब्रँडेड शूज आणि स्वस्त कपड्यांसाठी ओळखला जातो. कॉलेजच्या काळात मी तिथून खरेदी केली. मी ग्वाल्हेरचा आहे आणि मी तिथे क्रीडा महाविद्यालयात होतो. त्यावेळी माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. यामुळे, सुट्टीच्या दिवशी आम्ही चोर बाजारातून ब्रँडेड शूज खरेदी करण्यासाठी दिल्लीला यायचो. रात्रभर प्रवास करायचा आणि सरळ चोरांच्या बाजारात जायचं. खाण्यासाठी करीमच्या दुकानात थांबायचो. मला शहर माहित आहे, पण नेहमी रस्त्याबद्दल थोडा गोंधळ होतो.

मालिकेतून सुरुवात

शरद केळकर प्रथम दूरदर्शनच्या आक्रोश मालिकेत दिसला होता. ही मालिका 2004 साली आली. यानंतर शरद केळकर बऱ्याच काळासाठी अनेक टीव्ही शोचे होस्ट म्हणून दिसला होता. शरदने ‘सीआयडी’, ‘उतरन’ आणि ‘कुछ तो लोग कहेंगे’ यासह अनेक टीव्ही मालिकांमध्ये दीर्घकाळ काम केले. शरद केळकर यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

सुरुवातीला शरद केळकर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये कॅमिओ करताना दिसला. लोकांच्या नजरेत तो रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या ‘गोलियो की रसलीला : राम-लीला’ या चित्रपटात आला. चित्रपटातील त्याचे पात्र फार मोठे नव्हते, पण प्रेक्षकांना ते खूप आवडले. शरद केळकर याने प्रभाससाठी ‘बाहुबली’ चित्रपटात आपला आवाज डब केला होता.

हेही वाचा :

Nora Fatehi | मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी नोरा फतेही करायची ‘हे’ काम, अनुभव सांगताना म्हणाली…

आर्यन खानसोबत फोटो, एनसीबी म्हणते आमचा संबंध नाही, कोण आहे किरण गोसावी, ज्याच्यावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप?

Navratri 2021 Special Song : ‘घनी कूल छोरी’ ते ‘रामो रामो’पर्यंत, नवरात्रीच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून सामील करा ‘ही’ गाणी!

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.