Akshay Kumar | काम एके काम, आईच्या निधनानंतर दुःखातून सावरत शूटिंगवर परतला अक्षय कुमार!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारवर (Akshay Kumar) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अलीकडेच त्याने आपली आई गमावली आहे. अक्षय कुमारच्या आईची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या काळात अक्षय मुंबईच्या शूटिंगसाठी लंडनला गेला होता.

Akshay Kumar | काम एके काम, आईच्या निधनानंतर दुःखातून सावरत शूटिंगवर परतला अक्षय कुमार!
अक्षय कुमार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारवर (Akshay Kumar) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अलीकडेच त्याने आपली आई गमावली आहे. अक्षय कुमारच्या आईची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या काळात अक्षय मुंबईच्या शूटिंगसाठी लंडनला गेला होता. पण अक्षय कुमारला त्याच्या आईच्या तब्येतीची माहिती मिळताच तो लगेच भरतात परतला होता. पण आता अशा बातम्या समोर येत आहेत की, अक्षय उद्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईला रवाना होणार आहे.

चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सामील होऊन, वचनबद्धता पूर्ण करणार!

पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, अक्षय कुमारने आईच्या निधनामुळे दिग्दर्शक रणजीत तिवारी यांच्या थ्रिलर चित्रपटाचे शूटिंग मध्येच सोडले होते. परंतु, अक्षयला माहित आहे की आजकालची आर्थिक स्थिती किती गंभीर आहे, त्यामुळे त्याने केवळ निर्मातेच नव्हे तर, या चित्रपटातील इतर अनेक लोकांचा विचार करून, या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये शक्य तितक्या लवकर सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून कोणालाही नुकसान होणार नाही, आणि म्हणूनच तो उद्या यूकेला जात आहेत.

अक्षयने रणजीतच्या चित्रपटाचे नाव जाहीर केले

दिग्दर्शक रणजीत तिवारी यांच्या या प्रकल्पाचे नाव उघड करताना अक्षय कुमारने याबद्दल माहिती दिली होती की, ‘मला नेहमी सायको-थ्रिलरमध्ये काम करायचे होते आणि आता मी ते करत आहे. मी ‘सिंड्रेला’ साठी शूट करणार आहे, तर आधी ‘मिशन सिंड्रेला’ चित्रपटाच्या नावाची चर्चा होत होती पण अक्षयच्या नावानंतर हे नाव (सिंड्रेला) कन्फर्म मानले जात आहे. चित्रपटाचे नाव आहे ‘सिंड्रेला’. नाव एखाद्या परीकथेसारखे वाटेल, पण हा एक सायको-थ्रिलर चित्रपट असेल. ‘सिंड्रेला’ हा तमिळच्या हिट सायकोलॉजिकल थ्रिलर ‘रत्ससन’चा हिंदी रिमेक आहे.

वर्क फ्रंटवर अक्षय सध्या आनंद एल रायच्या रक्षाबंधन या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. याशिवाय तो ‘सूर्यवंशी’, आणि ‘अतरंगी रे’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

कुटुंबाला ठेवतो मीडियापासून दूर

अक्षयने बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी ट्विंकल खन्नाशी लग्न केले आहे. या जोडप्याला दोन मुलेही आहेत. त्यांच्या मुलीचे नाव नितारा कुमार आणि मुलाचे नाव आरव आहे. अक्षय त्याच्या कुटुंबाला मीडियापासून दूर ठेवतो. तो त्याच्या कुटुंबासह सार्वजनिक ठिकाणी क्वचितच दिसतो, अलीकडेच त्याच्या आईच्या मृत्यूवर, अक्षयने सोशल मीडियावर एक लांब पोस्ट शेअर करून चाहत्यांसोबत आपल्या भावना व्यक्त केल्या आणि कुटुंब आणि आई त्याच्यासाठी किती खास आहेत हे सांगितले.

हेही वाचा :

पेशाने चार्टर्ड अकाउंटंट, संगीताची आवड! गणेशोत्सवानिमित्ताने गायक कपिल रौनक यांचे ‘माझा देवा’ गाणे रिलीज

Happy Birthday Anurag Kashyap  | खिशात अवघे पाच हजार रुपये घेऊन मुंबईच्या रस्त्यांवर राहिला, आजघडीला कोटींचे चित्रपट बनवतो अनुराग कश्यप!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI